शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टच्या रात्री १२९ जणांना अटक

By admin | Updated: January 2, 2017 01:05 IST

३१ डिसेंबरची रात्र अनेकांसाठी त्रासदायक ठरली आहे. पोलिसांनी १२९ जणांना दारू पिऊन वाहन

ड्रंक अँड ड्राईव्ह : १४५ गुन्हे दाखल चंद्रपूर : ३१ डिसेंबरची रात्र अनेकांसाठी त्रासदायक ठरली आहे. पोलिसांनी १२९ जणांना दारू पिऊन वाहन चालविण्याच्या आरोपात अटक केली आहे. यामध्ये १४५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनात नवीन वर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीवर नियंत्रण व जिल्ह्यात कुठेही लहान मोठे अपघात होणार नाही याची दक्षता म्हणून ड्रांक अँड ड्राईव्हच्या मोठ्या प्रमाणात केसेस करण्यात आल्यात. ३१ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे पाच, पोलीस स्टेशन पडोली येथे चार, पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे तीन, भद्रावती सहा, घुग्घुस सहा, चिमूर नऊ, तळोधी दोन, चंद्रपूर शहर सात, राजुरा चार, विरूर दोन, मूल सहा, गडचांदूर तीन, भारी एक, पिट्टीगुडा येथे एक, नागभीडला पाच, गोंडपिपरी चार, शेगाव पाच, माजरी चार, सावली सहा, सिंदेवाही तीन, पोंभुर्णा एक, भिसी येथे चार, जिवती चार, कोरपना चार, टेकामांडवा दोन, धाबा येथे एक, कोठारी एक, लाठीमध्ये चार, पाथरी येथे एक, रामनगर पोलीस स्टेशन १२, ब्रह्मपुरी १२, वरोरा येथे १३असे एकूण ३० पोलीस स्टेशन अंतर्गत १४५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या विधिध ठिकाणीच्या १२९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) दारूबंदीनंतर महापूर ४जिल्ह्यात दीड वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली. तेव्हापासून दररोज अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याचे दारूबंदी लागू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु गेल्या दीड वर्षात दारुबंदी लागू होऊन त्याचा चंद्रपूरकरांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सवत: पोलीस आपल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगत आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर संपूर्ण जिल्ह्यात वाहात असल्याचे ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिने सिद्ध केले आहे.