एकट्या चंद्रपूर महानगरात १२० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST2021-03-25T04:27:11+5:302021-03-25T04:27:11+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार २४४ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ...

120 new patients in Chandrapur metropolis alone | एकट्या चंद्रपूर महानगरात १२० नवे रुग्ण

एकट्या चंद्रपूर महानगरात १२० नवे रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार २४४ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ३५१ झाली आहे. सध्या १४८० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ५९ हजार ८९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख २७ हजार ९१६ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बाॅक्स

चंद्रपूर व वरोरा झाले कोरोनाचे हाॅटस्पाट

कोरोनाची लाट कमी होत असताना नव्या वर्षात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. या दुसऱ्या लाटेत चंद्रपूर महानगरासह वरोऱ्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढत आहे. ही रुग्णसंख्या बघता हे दोन्ही शहरे कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाल्याचे दिसून येत आहे.

सात दिवसात चंद्रपूरात ४२१ नवे रुग्ण

गेल्या सात दिवसात चंद्रपूर शहरात तब्बल ४२१ नव्या रुग्णांची भर पडली. दररोज येणाऱ्या अहवालात चंद्रपूर शहरातील रुग्णांचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. या पाठोपाठ वरोरा शहराचा क्रमांक लागतो. सात दिवसात वरोरा तालुक्यात ११० रुग्ण वाढले आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय रुग्णसंख्या

चंद्रपूर मनपा - १२०

चंद्रपूर - २९

बल्लारपूर - ११

भद्रावती - १८

ब्रह्मपुरी -१२

नागभिड - ३

सिंदेवाही -१४

मूल - ७

सावली -४

पोंभुर्णा - १

राजूरा -४

वरोरा - ४०

कोरपना - ७

इतर ठिकाण - ६

Web Title: 120 new patients in Chandrapur metropolis alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.