२४ किमी रस्त्यावर १२ स्पीड ब्रेकर

By Admin | Updated: October 9, 2014 22:59 IST2014-10-09T22:59:13+5:302014-10-09T22:59:13+5:30

रस्ता अपघातावर आळा घालण्यासाठी रस्त्यावर स्पिड ब्रेकर लावण्यात येतात. मात्र स्पीड ब्रेकर नियमानुसार बनविण्यात आले नसल्याने आणि प्रमाणापेक्षा जास्त असल्याने अपघात टळण्याऐवजी

12 speed breakers on 24 km of road | २४ किमी रस्त्यावर १२ स्पीड ब्रेकर

२४ किमी रस्त्यावर १२ स्पीड ब्रेकर

चंद्रपूर: रस्ता अपघातावर आळा घालण्यासाठी रस्त्यावर स्पिड ब्रेकर लावण्यात येतात. मात्र स्पीड ब्रेकर नियमानुसार बनविण्यात आले नसल्याने आणि प्रमाणापेक्षा जास्त असल्याने अपघात टळण्याऐवजी अपघात होत आहे. यामुळे अनेकांना विविध आजारांनाही समोर जावे लागत आहे. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरची संख्या कमी करावी, नियमानुसार बांधावे तसेच पांढरे पट्टे मारावे, अशी मागणी आता वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. चंद्रपूर ते भद्रावती या २४ कि.मी.च्या रस्त्यावर तब्बल १२ स्पीड ब्रेकर आहे. तर चंद्रपूर शहरात वाट्टेल तिथे ब्रेकर असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
औद्योगिकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अपघाताच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. भद्रावती ते चंद्रपूर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. सारखी वर्दळ असलेल्या या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जातात. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहे. सदर अपघातावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावरील काही गावांजवळ, शाळेजवळ स्पीड ब्रेकर लावले आहे.
मात्र या स्पीड ब्रेकरची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे नियमानुसार ते तयार करण्यात आले नसल्याने आणि पांढरे पट्टे लावण्यात आले नसल्याने वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने अपघाताची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे वाहनधारक आजाराने त्रस्त होत आहे. जेथे गरज आहे तिथेच स्पिड ब्रेकर लावावे, अन्य ठिकाणचे ब्रेकर काढावे, अशी मागणी आता वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
चंद्रपूर ते भद्रावती दरम्यान २४ कि.मी. अंतर आहे. यात १२ स्पीड ब्रेकर आहे. यामुळे महामार्गावरील वाहनधारक अक्षरश: त्रस्त झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये नागरिकांना विविध आजारांना समोर जावे लागत आहे. सदर स्पिड ब्रेकरसंदर्भात ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 12 speed breakers on 24 km of road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.