शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

वाघाची झलक पाहण्यासाठी तब्बल १२ तास छतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM

सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल्या जंगलात दडून बसला असल्यामुळे तो कुणालाही दिसत नव्हता. यानंतर वनविभागाचे वेगवेगळे पथक दाखल झाले.

ठळक मुद्देसिंदेवाहीकरांनी अनुभवला थरार : कोरोनाच्या दहशतीत वाघाचीच चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : वाघांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. तरीही त्याची एक झलक बघण्याची संधी मिळाली तर कितीही वेळ वाट बघण्याची तयारी असते. वाघाच्या एक झलकसाठी तब्बल सकाळी ७.३० वाजतापासून हजारो नागरिक घरांच्या छतावर चढून होते. १२ तास उलटले तरीही वाघ दिसला नाही. सूर्य मावळतीला गेला तरी कुणीही जागा सोडली नाही. अखेर वाघ जेरबंद झाला. तरीही वाघाचे दर्शन घेता आले नाही. तो बघता आला नाही. याचा प्रत्यय मंगळवारी सिंदेवाहीकरांना आला. कोरोनाच्या दहशतीतही सिंदेवाहीत दिवसभर या वाघाचीच चर्चा होती.सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल्या जंगलात दडून बसला असल्यामुळे तो कुणालाही दिसत नव्हता. यानंतर वनविभागाचे वेगवेगळे पथक दाखल झाले. त्यांच्याकडून वाघाचा शोध सुरू झाला. अशातच वाघ बाहेर येईल आणि पुन्हा तो कुणावर हल्ला करेल, या भीतीने गर्दीने सुरक्षित जागा निवडली ती म्हणजे पसिरातील घरांचे छत. घटनास्थळ परिसरातील प्रत्येक घराच्या छतावर माणसांचीच गर्दी दिसत होती. दुसरीकडे वनविभागाची चमू वाघाला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात व्यस्त होती. वाघ वनविभागाला हुलकावणी देत होता.वाघालाही बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसल्यामुळे अखेर रात्री ७ वाजताच्या सुमारास त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश आले. तब्बल साडेअकरा तासानंतर वाघाचा थरार थांबला. वनविभागाने सुटकेचा श्वास घेतला.वाघाची एक झलक बघण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. परिसर सील असल्यामुळे कुणालाही आत जावून प्रत्यक्ष वाघ बघता आले नाही. ही सल मनात ठेवून नागरिक खाली उतरले. वाघाची चर्चा करीतच घरी परतले.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग