शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

१२ तासांचा बिबट-मानव संघर्ष

By admin | Updated: May 20, 2017 01:18 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या मानेमोहाडी संघर्ष त गावा-शेजारी बिबट्याने पाच लोकांना जखमी केले होते.

मानेमोहाडी येथील थरार : हिंस्त्रपशुंच्या हल्ल्यांमध्ये वाढ राजकुमार चुनारकर। लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या मानेमोहाडी संघर्ष त गावा-शेजारी बिबट्याने पाच लोकांना जखमी केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने रेसक्यू आॅपरेशन राबविले. त्या मोहिमेमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरी, बिबट मानवाचा तब्बल बारा तासाचा थरार अनेकांनी अनुभवला. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांचे पाण्याचे पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाशेजारी येत आहेत. त्यामुळे जंगलव्याप्त गावात हिंस्त्र पशुच्या हल्ल्याचा घटनेत वाढ होत आहे. नुकतेच ताडोबा येथील आग्निरक्षकाला ठार मारण्याची घटना झाली. तर अस्वलाच्या हल्ल्यात चार तेदुपत्ता मजुरांना जीव गममावा लागला. या घटनामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी व मानवाचा संघर्ष वाढला असल्याचे चित्र जंगलपरिसराचा गावात निर्मााण झाले आहे. मानव जीव साखळीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलात वाघ असणे गरजेचे आहे. त्यामुळे वनविभागाकडून वाघाचे रक्षण करण्यात येत आहे.तसेच नागरिक सरपणासाठी व इतर कामासाठी जंगलात जाऊ नये म्हणून गॅस सिंलेडरचे वाटप करण्यात येत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या लगत असलेल्या मानेमोहाळी या गावातील शेतकरी बकरी चारत असतांना सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करुन तीन लोकांना गंभीर जखमी केले. त्यामध्ये गिरीधर मुंडरे, विकास जिवतोडे, दवलत धाडसे, राजु चौधरी, अमोल ठेकेदार या पांच जणांनावर बिबटयाने हमला केला आहे. त्यामुळे बिबट व मानवाच्या संघर्षाचा थरार सकाळी १० ते रात्री १० असा तब्बल १२ तास उपस्थित नागरिकांनी अनुभवला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे डीसीएफ केवल सिंह याच्या नेतृत्वात आरएफ ओ निवंडे, सोनट्टके तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी यांच्या नेतृत्वात रेस्क्यु आॅपरेशन राबविण्यात आले. तर आमदार किर्तीकुमार भांगडिया हेसुध्दा घटना स्थळावर तळ ठोकून बसले होते. अखेर रात्री ९ वाजताच्या दरम्यान या बिबट मानवसंघर्षाच्या थराराचा शेवट बिबट्याला जेरबंद करण्यात झाला. फोटोचा मोह बेतला असता जीवावर मानेमोहाडी शेत शिवरात पुलामध्ये असलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामधील अनेकांना जवळ जावून बिबट्याचा फ ोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र यावेळी बिबटाने चक्क बाहेर निघून हल्ला केला. त्यामध्ये अमोल सर व राजु चौधरी जखमी झाले. विदेशी पर्यटकांनीही अनुभवला थरार वाघ पाहण्यासाठी ताडोबामध्ये विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मानेमोहाडी येथे मानव-बिबट्यामध्ये झालेला बारा तासांचा संघर्ष संयुक्त राट्रातील रहिवासी असलेल्या सरिता खानविलकर या विदेशी पर्यटन महिलेनी अनुभवला व हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. याबाबत प्रतिनिधीने विचारले असता, हा प्रसंग जीवनातील अद्भूत प्रसंग असल्याचे सांगितले. तसेच आपण याठिकाणी चौथ्यांदा अलो असून वन्य प्राण्यांवर व वनांवर अभ्यास करत असल्याचे सांगितले. शाबीरने वाचविले शिपायाचे प्राण नागरीकांच्या सुरक्षेसाठी व सुव्यवस्थेसाठी घटना स्थळावर आलेले शिपाई किशोर बोढे यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. मात्र यावेळी शाबीर पठाण याने बिबट्याच्या तोंडात बाबूंची काडी टाकून शिपाई कशोर बोढे यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. महिलांचीही अलोट गर्दी गावा शेजारी बिबट असल्याची वार्ता गावात पसरताच घटनास्थळावर वृध्द व महिलांनी मोठी गर्दी केली होती. आमदाराने केले नागरिकांना शांत वाघ पाहण्यासाठी पंचकोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दीला पागंवण्यासाठी पोलीस व वनविभागाचे कर्मचारी कायर् करीत होते. मात्र नागरिक त्यांचे ऐकत नव्हते. ही स्थिती पाहून आ. किर्तीकुमार भांगडीया यांनी घटनास्थळावरुन मागे व्हा व रेसक्यू आॅपरेशनसाठी मदतीचे आवाहन केले.