वाघाने केली १२ वासरांची शिकार; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 15:32 IST2020-02-29T15:31:32+5:302020-02-29T15:32:10+5:30
शेतात असलेल्या गोठ्यात शिरून वाघाने तब्बल १२ वासरांची शिकार केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

वाघाने केली १२ वासरांची शिकार; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: शेतात असलेल्या गोठ्यात शिरून वाघाने तब्बल १२ वासरांची शिकार केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. नागपूर-उमरेड रोडवर असलेल्या भिसीपासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या चिचोली येथील राजू राजूरकर यांच्या शेतात ह ी घटना घडली.
चिचोली शिवारात त्यांचे शेत आहे. शेतातल्या गोठ्याला तारेचे कुंपण आहे. या गोठ्यात गायी व वासरे ते बांधून ठेवतात. येथे रात्री राखणीला कोणीच नसते. शनिवारी सकाळी ते आपल्या शेतात गेले असता त्यांना गोठ्यात १२ वासरे मृतावस्थेत आढळली. या वासरांच्या अंगावरील जखमा पाहून त्यांच्यावर वाघाने हल्ला केला असावा असे लक्षात येत होते. या हल्ल्यात वाघाने गायींना मात्र कुठलीही इजा पोहचवली नव्हती.