शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

११६ सहकारी संस्था गुंडाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:48 IST

ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या ११६ सहकारी संस्थांनी वारेमाप कर्जवाटप केले. आर्थिक शिस्त पाळली नाही. त्यामुळे सहकार विभागाला या संस्था बंद करण्याचा आदेश द्यावा लागला. या संस्था गुंडाळण्यात येणार असल्याने सहकारी संस्थांमध्ये भागभांडवल गुंतविणाऱ्यांना ंकोट्यवधी रूपयांची कर्ज वसुली कशी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या कर्जवसुलीचे आव्हान : सहकार क्षेत्राला ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या ११६ सहकारी संस्थांनी वारेमाप कर्जवाटप केले. आर्थिक शिस्त पाळली नाही. त्यामुळे सहकार विभागाला या संस्था बंद करण्याचा आदेश द्यावा लागला. या संस्था गुंडाळण्यात येणार असल्याने सहकारी संस्थांमध्ये भागभांडवल गुंतविणाऱ्यांना ंकोट्यवधी रूपयांची कर्ज वसुली कशी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.२०१० च्या कालखंडामध्ये सहकारी कायद्यामध्ये दुरूस्ती झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये शेकडो सहकारी संस्थांची स्थापना झाली. गृहउद्योग, लघु व्यवसायापासून तर शेती उद्योग प्रक्रियेशी निगडीत असलेल्या बहुतांश क्षेत्रामध्ये विकासाची कामे करणे, हा या सहकारी संस्थांचा हेतू होता. सहकार विभागाकडून संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यात आले होते. सहकार चळवळीचे धोरणच ‘सकलांचे कल्याण’ या न्यायतत्त्वावर उभे असल्याने काही व्यक्तींनी स्वत:चे भांडवल गुंतविले. शेअर्स विकत घेतले. संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर मदत केली. पण, ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालणा देण्याचा मूळ हेतु बाजूला सारून काही सहकारी संस्थांमधील पदाधिकाºयांनी कागदोपत्री काम सुरू केले. शासनाकडून फायदे उपटून ग्रामविकासाचे कल्याण करीत आहोत, असा डांगोरा पिटण्याचा प्रकार सुरू ठेवला. मागील पाच वर्षांच्या कालखंडामध्ये या संस्थांची अर्थव्यवस्था पूर्णत: डबघाईस आली. जिल्हा उपनिबंधकांच्या मूल्यांकनानुसार सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या नापास झाल्याची सहकार क्षेत्रात केवळ चर्चा सुरू होती. दरम्यान, २०१७-१८ च्या अंकेक्षणात या संस्थांची स्थिती सुधारली नसल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील तब्बल ११६ सहकारी संस्था अवसायनात काढल्या. या संस्थांकडून आर्थिक देणे आणि घेणे असणाऱ्या व्यक्तींना सहकार विभागाने जाहीर आवाहन करून माहिती देण्याचे कळविले आहे. ५ आॅक्टोंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. पण आपल्याच मर्जीतील लोकांना सहकाराचे फायदे मिळवून देणाऱ्यांकडून वसुली कशी करायची, हा खरा प्रश्न सहकार विभाग व भांडवल गुंतविणाऱ्या व्यक्तींपुढे उभा ठाकला आहे.राजकारणामुळे सहकाराला वाळवीस्थानिक ते जिल्हा स्तरावरील राजकारणात सक्रीय असणाºया नेत्यांनीच सहकारी संस्था स्थापन केल्या. सहकारी तत्त्वातील कल्याणकारी धोरणाला फाटा देऊन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कामकाज पुढे दामटले. याचा अनिष्ठ परिणाम जिल्ह्यातील सहकार चळवळीवर झाला आहे. केवळ राजकारणामुळे सहकार क्षेत्राला वाळवी लागल्याचे ११६ सहकारी संस्थांच्या बुडीत प्रकरणातून पुढे आले आहे.चंंद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक बुडित संस्थाचंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक ४६ सहकारी संस्था बुडीत निघाल्या. त्यानंतर चिमूर तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो. या तालुक्यामध्ये ११ संस्था गुंडाळाव्या लागणार आहेत. पोंभुर्णा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, भद्रावती व राजुरा तालुक्यातही अवसायनात निघालेल्या संस्थांची संख्या चिंताजनक आहे. लघु व्यवसायाशी संबंधित असणाºया संस्थांना सहकार चळवळीचा पाया मानला जातो. परंतु, याच संस्था अवसायनात निघाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला भविष्य नाही, अशी शक्यता नागरिक वर्तवित आहेत.