११२ कोरोना पॉझिटिव्ह, संसर्गाचा आलेख चढताच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:18+5:302021-03-24T04:26:18+5:30
संसर्गाचा आलेख चढताच असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी १०४ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ...

११२ कोरोना पॉझिटिव्ह, संसर्गाचा आलेख चढताच!
संसर्गाचा आलेख चढताच असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी १०४ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ९६८ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार २४२ झाली आहे. सध्या १३१३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दोन लाख ५५ हजार ९९५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख २४ हजार १४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ४१३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण आढळतच आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक त्रिसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपुरात ३८ तर बल्लारपुरात १० रूग्ण
आज बाधित आढळलेल्या ११२ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ३८, चंद्रपूर तालुका नऊ, बल्लारपूर १०, भद्रावती नऊ, ब्रह्मपुरी आठ, नागभीड तीन, सिंदेवाही सहा, मूल पाच, सावली तीन, पोंभुर्णा एक, राजूरा तीन, चिमूर पाच, वरोरा पाच, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.