जिल्ह्यात ११० मिमी पाऊस

By Admin | Updated: September 1, 2015 00:42 IST2015-09-01T00:42:45+5:302015-09-01T00:42:45+5:30

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून सोमवारीही मुसळधार पाऊस झाला.

110 mm rain in the district | जिल्ह्यात ११० मिमी पाऊस

जिल्ह्यात ११० मिमी पाऊस

जिवती तालुक्यात सर्वाधिक : शेतकऱ्यांत समाधान
चंद्रपूर : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून सोमवारीही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११० मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस जिवती व भद्रावती तालुक्यात झाला.
सोमवारी दुपारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. चंद्रपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. एक तास झालेल्या पावसामुळे शहरात अनेक रस्ते पाण्याखाली आले. धान पिकाला या पावसामुळे फायदा होणार असून सोयाबीन, कापूस आदी पिकांनाही फायदा होणार आहे. तर सिंचन प्रकल्पाच्या जलस्तरातही वाढ झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 110 mm rain in the district