वाघाच्या तावडीतून ११ महिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:47+5:302020-12-12T04:43:47+5:30
मूल : तालुक्यातील करवन (कोटा) या गावानजिक लागून असलेल्या जंगलामध्ये सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावातील ११ महिला गेल्या असता ...

वाघाच्या तावडीतून ११ महिलांची सुटका
मूल : तालुक्यातील करवन (कोटा) या गावानजिक लागून असलेल्या जंगलामध्ये सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावातील ११ महिला गेल्या असता झुडुपात दबा धरून बसलेला वाघ अचानकपणे समोर आला. त्यामुळे भयभीत महिलांनी जिवाच्या आकांताने सैरवैरा पळून जवळच दिसणाºया वनविभाच्या मचानीवर चढल्या. वाघही मचानीखाली आला. जवळपास दोन तसा डरकाळी फोडून बसून राहिला. याबाबत महिलांनी मोबाईलवरून जि.प.अध्यक्ष संध्या गुरुनुले यांना माहिती दिली. त्यांनी लगेच वनविभागाला कळविले. वनविभागाच्या पथकाने वाघाला पिटाळून ११ महिलांचे प्राण वाचविले.
मूल वनपरिक्षेत्रातील करवन बिटातील जंगलात ११ महिला सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात दबा धरून बसलेला वाघ अचानक समोर आल्याने सर्वांची भंबेरी उडाली. काय करावे हे काही सुचत नव्हते. त्यावेळी महिलांनी जवळच असलेल्या मचानीचा आधार घेत वर चढल्या. तब्बल दोन तासापर्यत वाघ मचानीखाली घिरट्या घालत होता. त्यातील कन्नाके नामक महिलेनी जि.प.अध्यक्ष संध्या गुरुनले यांना मोबाइलवरुन माहिती दिली. गुरनुले यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना आणि मूलच्या उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना माहिती दिली. संबधित प्रशासनासह वनकर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून महिलांवर चालून आलेल्या त्या वाघाला पळवून लावले. आणि जवळजवळ दोन तास डरकाळीने भयभीत झालेल्या त्या महिलांचा जीव भांडयात पडला. या संपूर्ण घटनाक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाºया संध्या गुरनुले यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन त्या महीलांची भेट घेतली.