राजुरा सखी मंचतर्फे ११ कर्तबगार महिलांचा सत्कार
By Admin | Updated: March 18, 2016 01:07 IST2016-03-18T01:07:10+5:302016-03-18T01:07:10+5:30
लोकमत सखी मंच राजुरा तर्फे बुधवारी आयोजित महिला मेळाव्यात ११ कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.

राजुरा सखी मंचतर्फे ११ कर्तबगार महिलांचा सत्कार
सखी मंचच्या महिलांचा मेळावा : वृत्तपत्र विक्रेता आणि एजंटचा सत्कार
राजुरा : लोकमत सखी मंच राजुरा तर्फे बुधवारी आयोजित महिला मेळाव्यात ११ कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे आयोजित सखी मंच मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुभाष धोटे, आमदार अॅड. वामनराव चटप, तहसीलदार धर्मेग फुसाटे, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, प्रसार विभागाचे महाव्यवस्थापक संतोष चिपडा, प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे, जिल्हा प्रतिनिधी गोपाल मांडवकर, ब्रँच मॅनेजर विनोद बुले, प्रसार निदेशक रवीराज अंबडवार, ज्येष्ठ व्यापारी सतिश धोटे, नगरसेवक प्रा. अनिल ठाकूरवार, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, अनकेश्वर मेश्राम, वेदांत मेहरकुडे, मनोज गोरे, प्रा. अशोक डोईफोडे, जयंत जेनेकर, सखी मंचच्या संयोजिका जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, रिता पाटील, शिला जाधव आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राजुरा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ११ महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कवियत्री अल्का चंद्रशेखर, लक्कडकोटच्या शिला जाधव, राजुरा येथील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा मोरे, ज्योतिष्यशास्त्रात पीएचडी असलेल्या आशा शर्मा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ एजंट दिगांबर भाके यांचाही शाल व श्रीफळ देऊन लोकमतचे संपादक दिलीप तिखिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सोनिया गांधी कॉन्व्हेंटच्या मुलीनी स्वागत गीत व नृत्य सादर केले. प्रास्ताविक गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. संचालन लोकमतचे शहर प्रतिनिधी प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी तर आभार तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपूर सखी मंचची आज सभा
बल्लारपूर : लोकमत सखी मंच बल्लारपूरच्या सखींची सभा शुक्रवार १८ मार्चला दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. येथील चंदा संजय डुंबेरे, श्री टॉकीज जवळ, सिद्धार्थ वॉर्ड यांच्या निवासस्थानी सभा होणार असून या सभेत, महिलांकरिता काही स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सखींमधून वॉर्ड निहाय (प्रत्येक वॉर्डात एक) प्रमुखाची नियुक्ती केली जाणर आहे. तरी, या सभेत सखी सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सखी संयोजिका किरण दुधे तसेच लोकमतचे तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर यांनी केले आहे.
मूल येथे भावगीत व संगीत खुर्ची स्पर्धा
मूल : लोकमत सखी मंच मूलच्या वतीने सखी सदस्या व इतर महिलांसाठी पत्रकार भवन मूल येथे भावगीत व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन १८ मार्च शुक्रवारला दुपारी १ वाजता केले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, याच कार्यक्रमात नवीन सदस्या होऊ इच्छीणाऱ्या महिलांना सुद्धा सखींचे सदस्यत्व प्राप्त करता येऊ शकते. सदस्य झाल्यानंतर आकर्षक गिफ्ट सह विमा सुद्धा दिला जाणार आहे. तसेच लोकमत वृत्तपत्रात गोल्डन धमाका सुरु होत असून सोन्याचे दागिने जिंकण्याची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. तरी नोंदणी करण्याचे आवाहन तालुका संयोजिका जयश्री चन्नुरवार (९४०५५०३८९९) यांनी केले आहे.
नोंदणी अंतिम टप्प्यात
ब्रह्मपुरी : लोकमत सखी मंच बह्मपुरी येथील सदस्य नोंदणी शेवटच्या टप्प्यात आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी १८, १९ आणि २० मार्च पर्यंत दुपारी २ ते ५ या वेळेत डॉ. पंजाबराव देशमुख कन्या ज्यु. कॉलेज येथे सदस्य नोंदणी तथा गिफ्ट वाटप सुरु राहणार आहे. तरी लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावे, असे आवाहन लोकमत सखी मंच ब्रह्मपुरीने केले आहे.