शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

11 विद्यार्थी सुखरूप, एकाचा अजूनही पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.  यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आणि वरोरा येथील आदिती सयारे हे नुकतेच घरी पोहचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही चिमूर येथील विद्यार्थिनी बुखारेस्ट (रोमानिया) एअरपोर्टवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते. यातील ११ विद्यार्थी सुखरूप असून जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यासोबत प्रशासनाचा अजूनही संपर्क झाला नाही. विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत महेश भोयर याने संवाद साधला असून तो कोरपना येथील रहिवासी आहे.युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.  यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आणि वरोरा येथील आदिती सयारे हे नुकतेच घरी पोहचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही चिमूर येथील विद्यार्थिनी बुखारेस्ट (रोमानिया) एअरपोर्टवर आली आहे. नेहा शेख भद्रावती ही पोलंड येथे पोहचली आहे. चंद्रपूर येथील धीरज बिश्वास हा विद्यार्थी रोमानिया येथे आहे. चंद्रपुरातील दीक्षराज अकेला आणि कोरपना येथील महेश भोयर हे रोमानिया येथील बाॅर्डवरून एअरपोर्टकडे रवाना झाले आहेत. ब्रह्मपुरी येथील महेश उके याने हॅग्नी बाॅर्डर ओलांडल्याचे  प्रशासनाने सांगितले. त्यामुळे हे सर्व सुखरूप असून कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र बल्लारपूर येथील भोयर नामक विद्यार्थ्यांचा  संपर्क झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यासोबत संपर्क साधण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे.

महेश चालला २० कि.मी. पायीकोरपना येथील महेश विलास भोयर हा विद्यार्थी युक्रेनमधील इवानो विद्यापीठात शिक्षण घेत आहे. मात्र युद्ध सुरू झाले आहे आणि त्याला मायभूमीत केव्हा येतो, याची चिंता सतावत होती. विद्यापीठातून आठ तास बसने प्रवास करत रोमानिया-युक्रेन बाॅर्डर गाठले. त्यानंतर २० किमी पायी प्रवास करत रोमानियात तो दाखल झाला. येथून रोमानियाची राजधानी बुखारीपर्यंत पाचशे कि.मी.चा प्रवास करून तीन दिवसांपूर्वीच बुखारीस  विमानतळ त्याने गाठले. तेथील एका समाजसेवी संस्थेतर्फे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीन दिवसानंतर बुधवार २ मार्चला सायंकाळी ६ वाजता बुखारीस येथून विमानाने तो मायदेशी परतला आहे. तो दिल्ली विमानतळावर येणार आहे. महेश हा भारतातून ३० नोव्हेंबरला गेला होता.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी