11 centers of Cotton Marketing Federation will be closed from Wednesday | कापूस पणन महासंघाचे ११ केंद्र बुधवारपासून बंद होणार

कापूस पणन महासंघाचे ११ केंद्र बुधवारपासून बंद होणार

राज्यात सीसीआयकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी केली जाते. यंदा कापसाला केंद्र सरकारकडून ५ हजार ८२५ रूपये हमीभाव लागू केली. अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, खामगाव, नागपूर, नांदेड, परळी वैजनाथ, वणी, यवतमाळ, परभणी या ११ झोनमध्ये ११ खरेदी केंद्र सुरू आहेत. राज्य कापूस पणन महासंघाकडून ५६ केंद्र व १६४ जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू करण्यात आली. मात्र, काही खरेदी केंद्रांवर एक ६ क्विंटलही कापूस विकायला आणल्या जात नाही, असे सांगून केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्याने मुदतवाढ मिळाली होती. येत्या बुधवार (दि. १०) पासून सर्व खरेदी केंद्र ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जादा दर मिळेल, या हेतूने घरातच कापूस शिल्लक ठेवलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Web Title: 11 centers of Cotton Marketing Federation will be closed from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.