पाच वर्षांत २८१५ पैकी १०८२ घरकूल पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:42+5:302021-04-12T04:25:42+5:30
अनवर खान पाटण : जिवती तालुक्यात गेल्या पाच वर्षांत २८१५पैकी १०८२ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर १७३३ ...

पाच वर्षांत २८१५ पैकी १०८२ घरकूल पूर्ण
अनवर खान
पाटण : जिवती तालुक्यात गेल्या पाच वर्षांत २८१५पैकी १०८२ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर १७३३ घरकूल प्रतीक्षेत आहेत.
जिवती पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील ३६ ग्रा.पं. अंतर्गत २८१५ घरकूल मंजूर करण्यात आले असून त्यापैकी १०८२ घरकूल पूर्ण झाले असून उर्वरित १७३३ अपूर्ण आहे. पाटण ग्रामपंचायत येथे ७७ घरकूल मंजूर असून फक्त ४६ बांधण्यात आले. ३१ घरकूल अपूर्ण आहे. प्रधानमंत्री आवास योजना वर्ष २०१६/१७ प्राप्त उद्दिष्ट ४१६, पूर्ण घरकूल ३६६, अपूर्ण घरकूल ५०. वर्ष २०१७/१८ प्राप्त उद्दिष्ट ३१३, पूर्ण घरकूल २२४, अपूर्ण घरकूल ८९. वर्ष २०१८/१९ प्राप्त उद्दिष्ट १४५, पूर्ण घरकूल ८८, अपूर्ण घरकूल ५७. वर्ष २०१९/२० प्राप्त उद्दिष्ट ५१३, पूर्ण घरकूल १२०, अपूर्ण घरकूल ३९३.
वर्ष २०२०/२१ प्राप्त उद्दिष्ट ६०८, पूर्ण घरकूल ४ अपूर्ण घरकूल ६०४ रमाई आवास योजना वर्ष २०१६/१७ प्राप्त उद्दिष्ट ७३, पूर्ण घरकूल ५८, अपूर्ण १५. वर्ष २०१७/१८ प्राप्त उद्दिष्ट ११४, पूर्ण घरकूल, ५४ अपूर्ण घरकूल ६०. वर्ष २०१९/२० प्राप्त उद्दिष्ट २५०, पूर्ण ०, अपूर्ण घरकूल ०.
शबरी आवास योजना वर्ष २०१६/१७ प्राप्त उद्दिष्ट ३४, पूर्ण घरकूल २९, अपूर्ण घरकूल ०५. वर्ष २०१७/१८ प्राप्त उद्दिष्ट ८, पूर्ण घरकूल ०, अपूर्ण घरकूल ०. वर्ष २०१८/१९ प्राप्त उद्दिष्ट १०, पूर्ण घरकूल १, अपूर्ण घरकूल ९. वर्ष २०१९/२० प्राप्त उद्दिष्ट २०५, पूर्ण घरकूल २, अपूर्ण घरकूल २०३. या प्रकारे मागील पाच वर्षात एकूण २९८७ पैकी १०७७ घरकूल बांधकाम पूर्ण झाले असून १९१० बांधकाम अपूर्ण आहे.
काही घरकुल रेतीच्या अभावामुळे बंद पडल्याची माहिती आहे. काही प्रमाणात पाणीपुरवठा नसल्याने बंद आहे.