आगरझरीतील शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी
By Admin | Updated: October 10, 2015 00:23 IST2015-10-10T00:23:54+5:302015-10-10T00:23:54+5:30
येथील जनरल मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे वतीने ताडोबा मार्गावरील अतिदुर्गम ठिकाणावरील आगरझडी या गावात आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिर घेण्यात आले.

आगरझरीतील शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी
आरोग्यविषयक मार्गदर्शन : अनेकांनी घेतला लाभ
चंद्रपूर : येथील जनरल मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे वतीने ताडोबा मार्गावरील अतिदुर्गम ठिकाणावरील आगरझडी या गावात आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०६ जणांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला.
या शिबिरात आरोग्याबाबत काळजी घेण्याविषयी सल्ला देऊन नागरिकांना मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. या शिबिरात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजीव धानोरकर, सचिव डॉ. आनंद फुलझेले, कोषाध्यक्ष डॉ. अतुल चटकी तसेच डॉ. लोढीया, डॉ. चांदेकर, डॉ. जेणेकर, डॉ. देवगडे, डॉ. गोजे, डॉ. मालुसरे, डॉ. जीवने, डॉ. अशफाक, डॉ. भगत, डॉ. नगरकर, डॉ. माधुरी धानोरकर यांनी सहकार्य केले. आगरझरीचे सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील यांचे शिबिराच्या यशस्वीतेकरिता सहकार्य लाभले.
अशा दुर्गम भागात आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी पार पाडण्याचा मनोदय अध्यक्ष डॉ. धानोरकर यांनी भाषणातून व्यक्त केला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)