चंद्रपूर जिल्हा कारागृहात १०० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:16+5:302021-07-21T04:20:16+5:30
चंद्रपूर : येथील जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे महानगरपालिकेच्या सहकार्याने येथील ३७५ बंदीबांधव व तात्पुरते कारागृह येथील ६८ बंदीबांधव असे ...

चंद्रपूर जिल्हा कारागृहात १०० टक्के लसीकरण
चंद्रपूर : येथील जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे महानगरपालिकेच्या सहकार्याने येथील ३७५ बंदीबांधव व तात्पुरते कारागृह येथील ६८ बंदीबांधव असे एकूण ४४३ कारागृहातील बंदीबांधवांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला.
कारागृहातील सर्व ४४३ बंदी व ७५ कर्मचारी यांचे एकूण १०० टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसीकरण हे दोन टप्प्यात पूर्ण झालेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांवरील बंदीजनांचे तसेच कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ वर्षांवरील बंदींचे लसीकरण करण्यात आले. कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी लसीकरणाकरिता विशेष प्रयत्न केले. तसेच वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव पु. आत्राम, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित डोंगेवार, कारागृह अधिकारी रवींद्र जगताप, अतिरिक्त वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ सुहास नागमोके, शिवराम चवळे, सीताराम सुरकार, विजय भोरखंडे, रिंकू गाैर, निकेश बडवाईक, अजय चांदेकर, सचिन आटे यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले.