किल्ले सफाईला १०० दिवस
By Admin | Updated: June 17, 2017 00:41 IST2017-06-17T00:41:18+5:302017-06-17T00:41:18+5:30
येथील इको-प्रोच्या सदस्यांकडून मागील शंभर दिवसांपासून किल्ला-परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

किल्ले सफाईला १०० दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील इको-प्रोच्या सदस्यांकडून मागील शंभर दिवसांपासून किल्ला-परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी इको-प्रोचे सर्व कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. यावेळी जोपर्यंत किल्ला स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता सत्याग्रह सुरू ठेवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.
इको-प्रो संस्थेने स्वंयस्फुर्तपणे चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान १ मार्चपासून सुरू केले आहे. इको-प्रो चे सदस्य नियमीत रोज सकाळी ५.३० ते ९.३० या वेळेत श्रमदान करीत आहेत. १४ जूनला या अभियानास शंभर दिवस पूर्ण झाले आहे. संपुर्ण चंद्रपूर किल्ला जवळपास ९ किमीचा असून या परकोटाच्या आत जुने चंद्रपूर शहर वसलेले आहे. या किल्ला-परकोटास दोन मुख्य दरवाजे, दोन उपदरवाजे, पाच खिडक्या तर ३९ बुरूजे आहेत. किल्लावरून फिरण्याकरीता संपुर्ण किल्ल्यावर ९ कीमीचा पादचारी मार्ग आहे. मात्र या गोंडकालीन वारसा, किल्ल्याच्या देखरेखीकडे तसेच साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याची दुरवस्था झाली. त्यामुळे इको प्रोने स्वच्छा मोहिम राबवली. या स्वच्छता मोहिमेला शंभर दिवस पूर्ण झाल्यामुळे जोपर्यंत किल्ला पूर्ण स्वच्छ होत नाही. तोपर्यंत अभियान सुरु ठेवण्याचा निर्धार केला. या स्वच्छता मोहिमेत संस्थेचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, संजय सब्बनवार, धर्मेद्र लुनावत, जितेंद्र वाळके, मनीष गांवडे, रविंद्र गुरनुले, विनोद दुधनकर, राजु काहीलकर, बिमल शहा, विकील शेंडे, आशु सांगोळे, अनिल अडगूवार, सुमीत कोहळे, वैभव मडावी, हरीश मेश्राम, अतुल रांखुडे, आशीष मस्के, महेश होकणे, सागर कावळे, राजेश व्यास, हेमंत बुरडकर, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, कपील चैधरी, राजु हाडगे, अमोल उटट्लवार, सौरभ शेटये, विशाल रामेडवार, आदी सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत.