१० हजार टेलिफोनची खणखण मंदावली

By Admin | Updated: May 16, 2015 01:34 IST2015-05-16T01:34:01+5:302015-05-16T01:34:01+5:30

बीएसएनएल या शासकीय कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या चार वर्षांत दहा हजारांहून अधिक टेलिफोेन ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

10 thousand telephone calls have been sacked | १० हजार टेलिफोनची खणखण मंदावली

१० हजार टेलिफोनची खणखण मंदावली

मंगेश भांडेकर चंद्रपूर
बीएसएनएल या शासकीय कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या चार वर्षांत दहा हजारांहून अधिक टेलिफोेन ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. तर याच कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३७ हजार मोबाईल ग्राहकांनी खासगी सेवेचा मार्ग अवलंबिला आहे. बीएसएनएल सेवेत वारंवार येत असलेला बिघाड हे या मागचे मुख्य कारण असून अनेक ग्राहक बीएसएनएलच्या सेवेला कंटाळले असल्याचे यावरून दिसून येते.
भारतात दूरसंचार सेवेला सुरूवात झाली तेव्हा टेलीफोन ग्राहकांची संख्या अधिक होती. बीएसएनएल ही शासकीय कंपनी म्हणून या कंपनीकडे अनेक टेलीफोनधारकांचा कल होता. त्यामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे लाखो ग्राहक निर्माण झाले. मात्र या सेवेला आता ग्रहण लागल्याचे चित्र ग्राहकांची संख्या कमी होण्यावरून दिसून येत आहे.
२०११-१२ या वर्षात जिल्ह्यात बीएसएनएलचे टेलीफोनधारक ग्राहक ३२ हजार ३८४ होते. तर मोबाईल ग्राहक १ लाख ४० हजार ७७८ होते. तर चालू वर्षात टेलीफोनधारक ग्राहक २२ हजार १४२ तर मोबाईलधारक ग्राहक १ लाख ३ हजार ६९४ एवढे आहेत. यात गेल्या चार वर्षांत १० हजार २४२ टेलीफोनधारक तर ३७ हजार ८४ मोबाईलधारक ग्राहक कमी झाले आहेत.
बीएसएनएलच्या भ्रमनध्वनी सेवेत बिघाड हा नित्याचाच झाला असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत भ्रमणध्वनी सेवेचे जाळे विणणाचे काम बीएसएनएल कंपनीकडून झाले आहे. अनेक गावात भ्रमनध्वनी सेवा बीएसएनएलच्या माध्यमातून पोहचली आहे. मात्र सेवेत येत असलेला बिघाड ग्राहकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे.
त्यातच अनेक खासगी कंपन्या गावागावत पोहचल्या असून विविध योजना राबवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करून घेत आहेत. मात्र त्या तुलनेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याने ग्राहक खासगी कंपनीकडे वळले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भविष्यात आणखी काही ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे.
खासगी कंपन्या पडताहेत भारी
दूरसंचार क्षेत्रात विविध खासगी कंपन्या उतरल्या असून या कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेट सेवा, एसएमएस सेवा, रोमींग, कॉलींग दर हे विविध कंपन्यांचे वेगवेगळे आहेत. या तुलनेत बीएसएनएलचे दर अधिक असल्याचे ग्राहक सांगतात.
टॉवर उभारण्यास दिरंगाई
दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल ही एकच शासकीय कार्यरत असताना भविष्यातील विचार करून अनेक गावात टॉवर उभारणीसाठी रस्त्यात केबल टाकण्यात आले. मात्र आधुनीकरणात नव्याने रस्ते तयार झाले आहेत. यात बीएसएनएलने रस्त्यात टाकलेले केबल तुटले असून आता नव्याने केबल टाकण्यास दिरंगाई होत आहे. तर दुसरीकडे खासगी कंपन्या अतिरीक्त पैसा मोजून केबल टाकण्यासाठी पाऊले उचलतात. त्यामुळे ग्रामीण भागातही खासगी सेवेचे ग्राहक वाढले आहेत.
परवानगीसाठी अडकतात कामे
एखाद्या गावात टॉवर उभारणी किंवा केबल टाकण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागत असते. यात वरिष्ठांकडून दिरंगाई केली जाते. तर खासगी कंपन्या यात सरस ठरतात. त्यामुळे ग्राहकांचा कल खासगी सेवेकडे वळला असल्याचे खुद्द बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: 10 thousand telephone calls have been sacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.