नागपुरातील रॅलीसाठी १० हजार काँग्रेस कार्यकर्ते जाणार

By Admin | Updated: April 9, 2016 01:33 IST2016-04-09T01:33:10+5:302016-04-09T01:33:10+5:30

काँग्रेसच्या वतीने ११ एप्रिल रोजी नागपुरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षाच्या सांगता समारंभानिमीत्त आयोजित रॅलीसाठी ,...

10 thousand Congress workers will go for the rally in Nagpur | नागपुरातील रॅलीसाठी १० हजार काँग्रेस कार्यकर्ते जाणार

नागपुरातील रॅलीसाठी १० हजार काँग्रेस कार्यकर्ते जाणार

चंद्रपूर : काँग्रेसच्या वतीने ११ एप्रिल रोजी नागपुरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षाच्या सांगता समारंभानिमीत्त आयोजित रॅलीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून १० हजारांवर कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे यांनी दिली.
नागपुरातील या रॅलीसंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तुकाराम रेंगे पाटील, महेश मेंढे, विधानसभा अध्यक्ष शिवा राव प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजनासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, सुमारे एक ते दीड लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असून कस्तुरचंद पार्कवर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी नेतेमंडळी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पासेस, बैठक व्यवस्था आदींची काळजी घेतली जात असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या सर्व बाबींचा आढावा घेत आहेत. हा मेळावा म्हणजे पक्षाचे शक्तिप्रदर्शन नसून डॉ. बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केलेले आयोजन असल्याचे तुकाराम रेंगे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. विदर्भभूमीत होणाऱ्या या समारोपिय सोहळ्यातून विदर्भाच्या लढ्यासंदर्भात काय निर्णय होणार, याचे उत्तर मात्र त्यांनी टाळले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 10 thousand Congress workers will go for the rally in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.