सट्टापट्टी चालविणाऱ्या १० जणांना अटक
By Admin | Updated: May 23, 2015 01:24 IST2015-05-23T01:24:25+5:302015-05-23T01:24:25+5:30
शहरात वर्षानुवर्ष सट्टापट्टी व्यवसाय जोमात सुरू आहे. अचानक काल पोलिसांना जाग आली.

सट्टापट्टी चालविणाऱ्या १० जणांना अटक
ब्रह्मपुरी : शहरात वर्षानुवर्ष सट्टापट्टी व्यवसाय जोमात सुरू आहे. अचानक काल पोलिसांना जाग आली. पेठवार्डातील सुनील महादेव निनावे व त्याचे पाच साथीदार आणि अनिल महादेव निनावे व त्याचे दोन साथीदार दोन असे एकूण दहा सट्टापट्टी व्यवसायिकांना त्याच्या घरावर धाडी पकडून अटक केली आहे.
सट्टापट्टी संदर्भात यापूर्वी ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते व ‘पट्टी’ चा पुरावा ब्रह्मपुरीतून दिला होता. पण कारवाई ठोसपणे होत नव्हती. काल अचानक पोलिसांनी पूर्वी माहित असलेल्या ठिकाणी धाडी टाकून दहा लोकांना अटक केली आहे. पेठवार्डमधील सुनील व अनिल हे दोघेही सट्टापट्टी व्यवसाय करीत असून त्यांनी अन्य पट्टी कापण्यासाठी माणसे नेमली होती. त्या माणसावरसुद्धा कारवाई करण्यात आली. सुनील महादेव निनावे यांच्यासह त्याचे पाच साथीदारांना पकडून १९४५ रुपये जप्त केले तर अनिल महादेव निनावे यांच्यासह त्याचे दोन साथिदारांना पकडून ११५५ रुपये जप्त केले. फॉशी चौकात होमराज मुखरु भोयर रा. उदापूर याला पकडून ३२५ रुपये जप्त केले आहे. मुंबई जुगार अॅक्टनुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिसांच्याच आशीर्वादाने सट्टा सुरू होता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता अचानक त्यांना एकाएकी अटक केल्याने केवळ हा एक फॉर्स तर नसावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)