चिमूर आमदारांकडून कोरोना रुग्णांसाठी १० ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST2021-04-27T04:29:20+5:302021-04-27T04:29:20+5:30

नागभीड : नागभीड तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर येथील कोविड सेंटरला ...

10 oxygen cylinders for corona patients from Chimur MLAs | चिमूर आमदारांकडून कोरोना रुग्णांसाठी १० ऑक्सिजन सिलिंडर

चिमूर आमदारांकडून कोरोना रुग्णांसाठी १० ऑक्सिजन सिलिंडर

नागभीड : नागभीड तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर येथील कोविड सेंटरला भेट दिले. कोणत्याही गरीब रुग्णाला ऑक्सिजनकरिता भटकावे लागणार नाही व कुणावरही ऑक्सिजनअभावी मृत्यू होण्याची पाळी येणार नाही, हे लक्षात घेऊन आमदार भांगडिया यांनी हा उपक्रम राबविला. हे १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर नागभीड येथील कोविड सेंटरला देण्यात आले. याशिवाय ५०० लिटर सॅनिटायझरही देण्यात आले. यावेळी तहसीलदार मनोहर चव्हाण, नायब तहसीलदार भामरे, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी, पोलीस उपनिरीक्षक खेडीकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृउबास सभापती आवेश पठाण, न.प.चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीकांत कामडी उपस्थित होते.

Web Title: 10 oxygen cylinders for corona patients from Chimur MLAs