चंद्रपुरात १० घरफोड्या

By Admin | Updated: April 20, 2016 01:13 IST2016-04-20T01:13:09+5:302016-04-20T01:13:09+5:30

शहरातील जगन्नाथबाबानगर परिसरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ...

10 burglars at Chandrapur | चंद्रपुरात १० घरफोड्या

चंद्रपुरात १० घरफोड्या

नागरिकांत दहशत : दोन मोटारसायकल, कॅमेरा लंपास
चंद्रपूर : शहरातील जगन्नाथबाबानगर परिसरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरातील तब्बल घरे चोरट्यांनी फोडली. एकाच रात्री १० घरफोड्या होण्याची ही गत काही वर्षांतील पहिलीच घटना असून या घटनेमुळे सामान्य नागरिकांसह पोलीस यंत्रणाही हादरून गेली आहे.
चोरट्यांनी १० ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र केवळ दोन ठिकाणावरून त्यांनी दोन मोटारसायकल व कॅमेरा लंपास केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर निरव शांततेत चोरट्यांनी आपले चौर्यकर्म आटोपले. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी जगन्नाथबाबानगर परिसरातील साई प्लाझामध्ये किरायाने वास्तव्याला असलेले गोपाल देवराव मेश्राम यांची ३५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल व पाच हजार रुपये किंमतीचा कॅमेरा लंपास केला. तसेच त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या भारत चवाटे यांची मोटारसायकल लंपास केली. यासोबतच याच परिसरातील सुधारकर पाटील, एन.घोगे, जगदीश कथले, बंडू नागपुरे, विजय खेडकर, गणपत आगलावे, यांच्या निवासस्थानासह अंबिका बहुद्देशिय शिक्षण संस्थेचे कार्यालय तसेच सद्गुरू मेडीकलचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणावरून कोणताही मुद्देमाल चोरट्यांच्या हाती लागला नाही. मंगळवारी घटना उघडकीस आल्यानंतर गोपाल मेश्राम यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८०, ५११, ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)


घुग्घुस मध्ये ६४ हजारांच्या दागिन्यांची चोरी
घुग्घुस : येथील कॉलरी गाधीनगरमधील कामगार वसाहतीत अज्ञात चोरट्यांनी क्वॉर्टरचे कुलूप तोडून ६४ हजारांचे सोनेचांदीचे दागीने लंपास केले. सदर घटना सोमवारी उघडकीस आली. वेकोलिच्या गांधीनगर कामगार वसाहतीत वास्तव्यास असलेले रामया कलवल हे १५ ते १७ एप्रिल दरम्यान क्वॉर्टरला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. काल परत आल्यानंतर क्वॉर्टरचे कुलूप तोडून असल्याचे दिसून आले. घरात पाहणी केली असता, क्वॉर्टरमधील रोख दोन हजार व ६४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 66 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. मंगळवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळावर श्वानपथकाला पाचारण केले. मात्र कोणतेही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले नाहीत. ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक चिडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विलास निकोडे तपास करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: 10 burglars at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.