१ लाख नोंदणीकृत कामगार, मदत केवळ ५० हजार कामगारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:51+5:302021-03-25T04:26:51+5:30
बॉक्स २० हजार कामगारांना विविध योजनांचा लाभ नोंदणीकृत कामगारांसाठी कामगार कार्यालयाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील २० हजार ...

१ लाख नोंदणीकृत कामगार, मदत केवळ ५० हजार कामगारांना
बॉक्स
२० हजार कामगारांना विविध योजनांचा लाभ
नोंदणीकृत कामगारांसाठी कामगार कार्यालयाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील २० हजार ३४२ बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या २८ योजनेंतर्गत ११ कोटी१९ लाख ३४ हजार ५०० रुपयांचे वितरण करण्यात आले. तर ७२ हजार ८८२ कामगारांना संच पेटीचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती कामगार कार्यालयाकडून मिळाली आहे.
------
कोट
नोंदणीकृत व पात्र कामगारांनाच शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असतो. बांधकाम कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीसाठी केवळ २५ व नूतनीकरणासाठी केवळ ६० रुपये शुल्क द्यावे लागतात. कामगारांनी नोंदणी करून घ्यावी.
-नितीन पाटणकर, सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर
बॉक्स
जिल्ह्यात एकूण बांधकाम कामगारांची संख्या १,१८,८४०
पहिल्या टप्प्यात लाभ मिळालेले कामगार ५१,७१९
दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळालेले कामगार ४६३०२