१८ ते ४४ वयोगटातील १ लाख २९ हजार ४४४ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:54+5:302021-07-21T04:19:54+5:30
१८ ते ४४ वयोगटातील तरुणांना लस दिल्या जात असून याला बुधवारी एक महिना पूर्ण होत आहे. जनजागृती मोठ्या प्रमाणात ...

१८ ते ४४ वयोगटातील १ लाख २९ हजार ४४४ जणांनी घेतली लस
१८ ते ४४ वयोगटातील तरुणांना लस दिल्या जात असून याला बुधवारी एक महिना पूर्ण होत आहे. जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात असतानाही लसच उपलब्ध नसल्यामुळे अनेक केंद्र बंद पडली आहेत. तर काही केंद्रांवर ऑनलाइन तसेच ऑफलाइन लस दिल्या जात आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार ७५८ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये पहिला डोस पूर्ण करणाऱ्यांची संख्या ४ लाख ७३ हजार १८४ आहे. तर १ लाख २० हजार ५७४ जणांनी दुसरा डोसही पूर्ण केला आहे. १८ ते ४४ वयोगटात एकूण १ लाख २९ हजार ४४ जणांना लस देण्यात आली असून यातील १ लाख २० हजार ४२७ जणांनी पहिला तर केवळ ९ हजार १७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
बाॅक्स
एकूण लसीकरण - ५९३७५८
पहिला डोस - ४७३१८४
दुसरा - १२०५७४
१८ ते ४४ वयोगटात झालेले लसीकरण - १२९४४४
पहिला डोस - १२०४२७
दुसऱ्या डोसची संख्या - ९०१७
बाॅक्स
गर्भवती, स्तनदा माता संभ्रमात
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना प्रशासनाला आहेत. दरम्यान, मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र गर्भवती, स्तनदा मातांमध्ये संभ्रम असून काही मोजक्याच महिलांनी लस घेतली आहे.
बाॅक्स
खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद
जिल्ह्यात पाच खासगी रुग्णालयांना पैसे घेऊन लस देण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मागील अनेक दिवसांपासून हे लसीकरण बंद आहे. त्यामुळे इच्छा असतानाही अनेकांना यापासून वंचित राहावे लागत आहे. दुसरीकडे खासगी डाॅक्टरांना योग्य गाइड लाइनच न आल्यामुळे डाॅक्टरसुद्धा संभ्रमात पडले आहेत.