शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

१ कोटी ४४ लाख ८० हजारांचा अमली साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 3:42 PM

Chandrapur : प्रशासनाची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांकडून तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नियम व नियमन २०११ प्रतिबंध अन्नपदार्थ कारवाई अंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत १५ प्रकरणांत १३ हजार ३२९ किलो असा एकूण किंमत १ कोटी ४४ लाख ८० हजार २२७ रुपयांचा साठा जप्त केल्याची माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीतून देण्यात आली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी पडली.

यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, जिल्हा मौखिक कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पिपरे, डॉ. श्वेता सावलीकर, डॉ. वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत अवगत करावे. तसेच शाळा- महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे. याबाबत शाळांकडून माहिती मागवून त्यांच्या परिसरात तंबाखू विक्रीची दुकाने नाहीत, याबाबत हमीपत्र घ्यावे. शासकीय कार्यालयात तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

५५ हजार ३७० रुपयांचा दंड वसूलसिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा) कलम ४ अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये ५६६ नागरिकांकडून ५५,३७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागाच्या वतीने गतवर्षी २०७६ प्रकरणांत ४ लाख १५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

यावर झाली चर्चामागील सभेचे इतिवृत्त, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत कार्याचा अहवाल सादर करणे, ३१ मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करणे, जिल्ह्यामध्ये कोटपा कायदा कलम ४, कलम ५, कलम ६ (अ) आणि (ब) प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करणे, पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाSmugglingतस्करी