१ कोटी ३१ लाख रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:32 IST2017-05-23T00:32:04+5:302017-05-23T00:32:04+5:30

समाजकल्याण विभागात वैयक्तिक लाभाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनाचाही मोठा निधी अखर्चित राहिला होता.

1 crore 31 lakhs in the beneficiary account | १ कोटी ३१ लाख रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात

१ कोटी ३१ लाख रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात

समाज कल्याण विभाग : विशेष आदेशाने अखर्चित निधी शून्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समाजकल्याण विभागात वैयक्तिक लाभाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनाचाही मोठा निधी अखर्चित राहिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार होते. परंतु जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे व समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी पुढाकार घेत समाजकल्याण विभागाचा अखर्चित निधी शुन्यावर आणला आहे. तब्बल १ कोटी ३१ लाख ९ हजार ४०६ रुपये नुकतेच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले असून, १ हजार २६० लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनामध्ये वस्तूस्वरूपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतर रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत ९ जानेवारी रोजी शासनाने एक आदेश निर्गमित केला आहे. सोबत जिल्हा परिषदेचा स्वउत्पनातील राखून ठेवलेला निधी त्याच वित्तीय वर्षात किंवा लगतच्या आर्थिक वर्षामध्ये खर्च करण्यास मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने जिल्हा निधी २० टक्के अंतर्गत मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील ९० टक्के अनुदानावर साहित्य पुरवठा करण्यासाठी सामजकल्याण समितीमध्ये लाभार्थ्यांची निवड केली होती. त्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात हा अखर्चित निधी वितरीत करण्यास मंजूर प्रधान करण्यात आली आहे. यामध्ये २१ लाभार्थ्यांना पीठगिरणी, २६८ लाभार्थ्यांना ताडपत्री, ३०३ लाभार्थ्यांना काटेरी तार, २४४ सबमर्सिबल विद्युत पंप, २७१ लाभार्थ्यांना एचडीपोई पाईप व १५३ लाभार्थ्यांना आॅईल इंजिनचा लाभ देण्यात आला.
काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेत विविध विभागातील अखर्चित निधीवरुन चांगलेच वातावरण तापले असताना नव्याने सत्तेत आलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अखर्चित निधी खर्च करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेत काही महिन्यापूर्वी तत्कालीन पदाधिकारी शासनाकडून आलेला व स्वउत्पन्नातील रखून ठेवलेला निधी खर्च करण्यात अपयशी ठरले होते. विविध विभागात कोट्यावधी रुपयांचा अखचिरत निधी दिसून येत होता. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगले धारवरही धरले होते.
तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावून अखर्चित निधी महिनाभरात खचर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही अखर्चित निधी खर्च झाला नसल्यामुळे शेकडो लाभार्थी हक्काच्या योजनांपासून वंचित राहणार होते. दरम्यान, मार्च महिन्यात जिल्हा परिणषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होताच अखर्चित निधी खर्च करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यामध्ये समाजकल्याण विभागाने आघाडी घेतली असून, गतवर्षीचा संपूर्ण १ कोटी ३१ लाख ९ हजार ४०६ रुपयांचा निधी खर्ची घातला आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाचा अखर्चित निधी सद्यस्थितीत शुन्यावर आला आहे.
सदर अखर्चित निधी खर्च झाला असल्यामुळे शासनाकडून आणि जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील निधीतूनही नव्या योजना तयार करण्यासाठी समाजकल्याण विभागाला वाव मिळणार आहे.

समाजकल्याण विभागांतर्गत विविध योजनेतील शेकडो लाभार्थ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने अखर्चित निधी खर्च करण्यासाठी पुढाकार घेतला. या निर्णयामुळे गावखेड्यातील लाभार्थ्यांना हक्काच्या योजनेचा लाभ मिळाला असून अनेक लाभार्थी या योजनाच्या माध्यमातून स्वत:ची आर्थिक उन्नती करणार आहेत. थेट लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्यामुळे समाजकल्याण विभागाकडे प्रारंभी लक्ष केंद्रीय केले होते. यापुढेही सर्वसामान्याच्या हक्काच्या योजना जिल्हा परिषदेमार्फत प्राधान्याने राबिवल्या जाणार आहेत. शासनाकडून आलेला निधी कशाप्रकारे पूर्ण करता येईल, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जाणार आहेत.
- देवराव भोंगळे, अध्यक्ष, जि.प., चंद्रपूर

समाजकल्याण समिती सभापतिपदाची सुत्रे हाती घेतल्याननतर तब्बल सव्वा कोटीच्यावर निधी अखर्चित असल्याची निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने हा निधी कसा खर्च करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नाला यश आले असून शेकडो लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
- ब्रीजभूषण पाझारे, सभापती, जि.प., चंद्रपूर

Web Title: 1 crore 31 lakhs in the beneficiary account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.