परिचालकांना आयटी मंडळात तात्काळ सामावून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:46 IST2019-08-31T00:45:40+5:302019-08-31T00:46:44+5:30
२६ ऑगस्टपासनू टिष्ट्वटर सोशल माध्यमाचा वापर करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत टिष्ट्वटर मोर्चा करण्यात आला. त्यात देशपातळीवर क्रमांक १ वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेवत शासनापुढे अनेक प्रश्न मांडले.

परिचालकांना आयटी मंडळात तात्काळ सामावून घ्यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभिड : राज्य शासनाच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्र आय. टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण, ते न पाळल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संगणक परिचालकांनी दिला आहे.
२६ ऑगस्टपासनू टिष्ट्वटर सोशल माध्यमाचा वापर करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत टिष्ट्वटर मोर्चा करण्यात आला. त्यात देशपातळीवर क्रमांक १ वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेवत शासनापुढे अनेक प्रश्न मांडले.
राज्यातील २९ हजार ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे सर्व संगणक परिचालकासह ३५१ पंचायत समितीव ३४ जिल्हा परिषदांमधील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसह इत्तर मागण्यासाठी १९ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. पण, शासनाने दखल न घेतल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी टिष्ट्ववटर मोर्चा सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील बहुतांश संगणक परिचालकांनी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजताच्या कालावधीत पंतप्रधानमंत्री मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना टिष्ट्वटरवर टॅग करून #संगणकपरिचालक हा हॅशटॅग दिवसभरात अनेकवेळा क्रमांक १ वर ठेवला होता. संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसाठी नागभीड पंचायत समितीसमोर आंदोलन सुरू करण्यात आले अशी माहिती विदर्भ अध्यक्ष देवेंद्र गेडाम यांनी दिली.