शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

IAS Officer Salary: जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:34 IST

आयएएस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पगाराव्यतिरिक्त, अनेक प्रकारच्या सुविधा आणि समाजात जबरदस्त मान-सन्मान मिळतो. याशिवाय, आयएएस अधिकाऱ्याकडे  बरेच अधिकारही असतात. याचा वापर ते प्रशासन चालविण्यासाठी करतात.

आयएएस अधिकारी पदाची नोकरी ही देशातील सर्वात चांगली नोकरी मानली जाते. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना भारतीय नागरी सेवेत (IAS) सामील होण्याची संधी मिळते. दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन नागरी सेवा परीक्षा देतात. खरे तर, उत्कृष्ट पगाराव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्यांना अनेक प्रकारच्या  सुविधा आणि समाजात जबरदस्त मान-सन्मान मिळतो. याशिवाय, आयएएस अधिकाऱ्याकडे  बरेच अधिकारही असतात. याचा वापर ते प्रशासन चालविण्यासाठी करतात.

आयएएस अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं?पदवीनंतर उमेदवार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. आयएएस होण्यासाठी सर्वप्रथम यूपीएससीची पूर्व परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पास झायानंतर मेन्स परीक्षा असते. यूपीएससी परीक्षेची शेवटची स्टेज म्हणजे, इंटरव्ह्यू असतो. या तीनही स्टेज पार केल्यानंतर, मेरिट लिस्टमध्ये आलेल्या उमेदवारांची निवड होते. यात ज्या उमेदवारांचा रँक सर्वात चांगला असतो, त्यांना आयएएस सेवा अॅलॉट केली जाते.

किती असतो आयएएस अधिकाऱ्याचा पगार? एका आयएएस अधिकाऱ्याला सुरुवातीला 7 व्या वेतन आयोगानुसार, महिन्याला 56100 रुपये एवढा मूळ पगार (बेसिक सॅलरी) दिला जातो. याशिवाय त्यांना विविध प्रकारचे भत्ते दिले जातात. यानंतर, त्यांचा एकूण पगार जवळपास 1 लाख रुपये महीन्यापर्यंत पोहोचतो. एवढेच नाही, तर वेळेनुसार त्यांच्या पगारात वाढ होत जाते. जेव्हा एखादा आयएएस अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचतो, तेव्हा ज्याला जवळपास 2,50,000 रुपये प्रती महिना, एवढा पगार दिला जातो. कॅबिनेट सेक्रेटरी हे आयएएस अधिकारी रँकचे सर्वात मोठे पद आहे. सर्वाधिक पगारही याच पदासाठी मिळतो.

आयएएस अधिकाऱ्याला मिळतात 'या' खास सुविधा -एका आयएएस अधिकाऱ्याला उत्तम पगाराशिवाय विविध प्रकारच्या उत्कृष्ट सुविधाही मिळतात. त्यांना राहण्यासाठी बंगला, घरातील कामासाठी कर्मचारी आणि सरकारी कार मिळते. एवढेच नाही, तर आयएएस अधिकाऱ्यांना सुरक्षाही दिली जाते. त्यांचा सरकारी प्रवासही विनामूल्य असतो. याशिवाय, त्यांना अनेक प्रकारचे प्रशासकीय अधिकार दिले जातात. ज्याचा वापर ते परिस्थितीनुसार करू शकतात.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगcollectorजिल्हाधिकारीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षण