शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

रेल्वेमध्ये 3015 पदांसाठी बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 2:45 PM

इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : रेल्वेतनोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने वेगवेगळ्या विभागांमध्ये शिकाऊ पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पश्चिम मध्य रेल्वे अपरेंटिस भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 15 डिसेंबरपासून सुरू झाले आहेत. ही अर्ज प्रक्रिया 14 जानेवारी 2024 पर्यंत चालेल. या भरती प्रक्रियेद्वारे अपरेंटिस पदांवरील एकूण 3015 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये जनरल कॅटगरीसाठी 1224, अनुसूचित जातीसाठी 455, अनुसूचित जमातीसाठी 218, ओबीसींसाठी 811 आणि ईडब्ल्यूएससाठी 307 जागा राखीव आहेत.

उमेदवाराने 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे दरम्यान असावी. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

या विभागात आहेत जागा...जेबीपी डिव्हिजन : 1164 पदे बीपीएल कॅटगरी : 603 पदे कोटा डिव्हिविजन : 853 पदे सीआरडब्ल्यूएस बीपीएल : 170 पदे डब्ल्यूआरएस कोटा: 196 पदे मुख्यालय/जेबीपी: 29 पदे

निवड प्रक्रियाअधिसूचनेनुसार अर्ज केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. गुणवत्ता यादी 10वीच्या परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांवर किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) आणि ITI/ट्रेडमार्कच्या आधारे तयार केली जाईल.

अर्ज शुल्कसर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 136 रुपये आहे आणि SC, ST, PWBD आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 36 रुपये आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार WCR च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

टॅग्स :railwayरेल्वेrailway recruitmentरेल्वेभरतीjobनोकरी