इंजिनिअरिंग सोडून दुसरं काहीतरी करायचं म्हणता?-निर्णय कसा घ्याल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 17:02 IST2017-08-19T17:00:06+5:302017-08-19T17:02:04+5:30
पालक म्हणतात आम्ही मुलांना पुरेसं स्वातंत्र्य दिलं, पण ते म्हणताना त्याला निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती आणि अवधी मिळतोय का हे पहा.

इंजिनिअरिंग सोडून दुसरं काहीतरी करायचं म्हणता?-निर्णय कसा घ्याल?
-योगिता तोडकर
अतुलचे वडील माझ्याकडे आले होते. आमचा जुना परिचय असल्याने माझ्याशी मोकळेपणाने त्यांनी बोलायला सुरवात केली. म्हणाले, अतुल इंजिनिरिंग सोडून बीसीएस करायचं म्हणतोय. कधी म्हणतो अभ्यास जमत नाहीये, कधी म्हणतो त्याच मन नाही लागते इंजिनीरिंगमध्ये. काय करावं? हट्टच धरून बसलाय. खरं तर त्याच्या लहानपणापासून आम्ही त्याच्या मतानां नेहमीच वाव दिला. त्याच्या निर्णयांना खत पाणी घातलं. आणि आता इंजिनिरिंगची 2 वर्ष पूर्ण झाल्यावर याला याचा निर्णय बदलवासा वाटतोय. काळजी वाटतीये त्याची.आम्ही दिलेल्या मोकळीकतेकडून हा स्वैराचाराकडे तर नाही ना चाललाय?
आपण बाहेर जेंव्हा अस सांगतो, माझ्या मुलांना आम्ही निर्णयाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, तेंव्हा आपण पालक म्हणून काय करतोय याची जाणीव खरंच आपल्याला असते का मंडळी?
मुळात वयानुसर येणारे अनुभव व आपण घेत असणारे निर्णय यांचा खूप जवळचा संबंध. मग अशा वेळी कमी वयात मुलं खरंच निर्णय घेऊ शकतात का? फक्त पालक म्हणून आम्ही मुलांना कशी मोकळीक दिली आहे व घरातलं वातावरण कसे उदारमतवादी आहे हे दाखवण्यासाठी बहुतेक पालक मुलांना निर्णयाचे स्वातंत्र्य देतात. जोपर्यंत आपल्या मुलाचे विचार पुरेसे परिपक्व झालेत असे वाटत नाही तोपर्यंत पालक म्हणून महत्वाची भूमिका पार पाडणे गरजेचे आहे.
जेव्हा कोणतेही निर्णय तुमच्या मुलाला घ्यायचे आहेत त्यासाठी पुढील दोन गोष्टी आवश्य करा.
एकतर त्याला निर्णय घेण्यापूर्वी निर्णय घेण्यासाठी लागणारी माहिती कुठून मिळू शकते, यासाठी मदत करा. वेगवेगळ्या लोकांशी भेटी घालून द्या, त्यावर चर्चा करा, विविध पैलूंची जाणीव करून द्या. ऑनलाईन माहिती कशी मिळू शकते याचे ज्ञान द्या, निगिडत क्षेत्नातले वाचन त्यांच्या टिपण्य्या करण्याची सवय लावा. वेगवेगळ्या सामाजिक, विचार प्रबोधन होईल अशा कार्यक्र मांना न्या. या सगळ्यातून निर्णय घेण्यासाठी पुरेशी आणि महत्वाची माहिती त्याच्याकडे गोळा होईल. ज्याच्या आधारावर त्याच्याकडे निर्णयासाठी कोणते पर्याय आहेत हे त्याला समोर येईल.
दुसरी गोष्ट म्हणजे, जेंव्हा निर्णय घ्यायची वेळ आहे तेंव्हा सर्व प्रथम त्याला त्याचे विचार करून तुमच्यासमोर मांडण्याचा अवधी द्या. त्यानंतर एका कागदावर चक्क त्याच्याकडे असणारे पर्याय व त्याचे फायदे तोटे लिहून काढायला लावा. त्यामध्ये तुम्ही आणखी भर घाला. कोणत्या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतील, ते पेलताना त्याला काय करावं लागेल याची जाणीव त्याला करून द्या. सारासारपणे काय निर्णय घेता येईल यासाठी मदत करा.
थोडक्यात आपली मते मुलांवर लादू नका व ती स्वैराचाराकडे जातील इतकेपण स्वातंत्र्य देऊ नका. त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या निर्णयसाठीचे दिशादर्शक व्हा.
yogita1883@gmail.com