शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

TATA मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! विविध पदांवर मोठी भरती; १ लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 17:43 IST

Tata Memorial Hospital Recruitment 2021: कोणत्या पदांवर नोकरीची संधी आहे, शेवटची तारीख काय, ते जाणून घेऊया...

मुंबई: गेल्या काही कालावधीपासून TATA ग्रुपमधील विविध कंपन्या अनेकविध क्षेत्रांमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. कोरोना काळातही टाटाच्या अनेक कंपन्यांची घोडदौड कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना भरघोस बोनसही दिला. यातच आता रुग्णसेवेत आघाडीवर असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Tata Memorial Hospital Recruitment 2021) विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कोणत्या पदांवर नोकरीची संधी आहे, शेवटची तारीख काय, ते जाणून घेऊया...

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत. यातील काही पदे मेडिकल तर काही नॉन-मेडिकलसाठी आहेत. या रिक्त पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छूक उमेदवारांना २९ नोव्हेंबर सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

रिक्त पदांचा तपशील

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विविध पदांच्या २० जागा भरल्या जात आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. सहाय्यक प्रोफेसर ई-जनरल मेडिसीन, सहाय्यक प्रोफेसर ई (निवारक ऑन्कोलॉजी), सहाय्यक प्रोफेसर ई (मेडिकल ऑन्कोलॉजी), सहाय्यक प्रोफेसर ई (पॅथोलॉजी), सहाय्यक प्रोफेसर ई (मायक्रोबायोलॉजी), सहाय्यक प्रोफेसर ई (मेडिसिन), सहाय्यक प्रोफेसर ई (कॅन्सर विज्ञान), सहाय्यक प्रोफेसर ई (प्लास्टिक सर्जरी), सहाय्यक प्रोफेसर ई (रेडियोलॉजी), सहायक रेडियोलॉजिस्ट डी, हेड, सूचना प्रौद्योगिकी, टीएमएच, ऑफिसर इनचार्ज, साइंटिफिक ऑफिसर, ज्युनिअर इंजिनियर, वैज्ञानिक सहाय्यक सी, टेक्निशियन, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, पंजाब आणि नर्स (A, B, C) या पदांवर भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले गेले आहेत. 

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

विविध रिक्त पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदांसाठी जागा देखील स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच सदर सर्व पदांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे असून, प्रमुख माहिती तंत्रज्ञान, TMH साठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे, असे सांगितले जात आहे. 

वरिष्ठ निवासी/विशेषज्ञ वरिष्ठ निवासीय पदांसाठीही भरती

उपरोक्त भरती प्रक्रियेशिवाय वरिष्ठ निवासी / विशेषज्ञ वरिष्ठ निवासीय पदांसाठी १७० जागा भरण्यात येत आहे. याची मुलाखतीची तारीख १ डिसेंबर असून,  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD, MD (Anesthesiology), MD (Emergency Medicine) आणि MD (Chest Medicine) मध्ये शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. MD/DNB पदांसाठी १ लाख ०१ हजार रुपये आणि DM पदांसाठी १ लाख १० हजार रुपये पगार असेल, असे सांगितले जात आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://tmc.gov.in/index.php/en/ या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घ्यावी. 

टॅग्स :Tataटाटाjobनोकरी