शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

BSF, CRPF, SSB आणि ITBP मध्ये दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 1:51 PM

उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर रजिस्ट्रेशन करू शकतात. 

नवी दिल्ली : कर्मचारी निवड आयोगाने एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), एआयए, एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. यासाठी उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर रजिस्ट्रेशन करू शकतात. 

रजिस्ट्रेशननंतर अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. तसेच, या पदांच्या भरतीसाठी परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल. परीक्षा सीबीटी पद्धतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. सीबीटी परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातील.

कोणत्या विभागात किती पदे?बीएसएफ - 27875 पदेसीआयएसएफ - 8598  पदेसीआरपीएफ – 25427 पदेएसएसबी – 5278 पदेआयटीबीपी – 3006 पदेएआर - 4776 पदेएसएसएफ - 583 पदेएनआयए - 225 पदे 

पात्रता :कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण या सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही जारी केलेली अधिसूचना तपासू शकता.

वयोमर्यादा :अर्जदारांचे वय 1 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. याचबरोबर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.

अर्जाचे शुल्क :एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2023 परीक्षेसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया : सीबीटी परीक्षा आणि इतर परीक्षांद्वारे अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पीईटीसाठी बोलावले जाईल. सीबीटी परीक्षेसाठी सर्व यशस्वी अर्जदारांना आयोगाकडून प्रवेशपत्र जारी केले जाईल. निवड प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी इत्यादींमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी नियुक्त केले जाईल. .

असा करता येईल अर्ज :- एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.- होमपेजवर दिलेल्या लॉग इन टॅबवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा.- आता संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा.- कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क जमा करा.- आता सबमिट करा. 

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनBSFसीमा सुरक्षा दल