BSF, CRPF, SSB आणि ITBP मध्ये दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 01:51 PM2023-11-20T13:51:06+5:302023-11-20T13:53:07+5:30

उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर रजिस्ट्रेशन करू शकतात. 

ssc gd constable 2023 notification out for 75768 posts 10th pass govt jobs | BSF, CRPF, SSB आणि ITBP मध्ये दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अधिसूचना जारी

BSF, CRPF, SSB आणि ITBP मध्ये दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, अधिसूचना जारी

नवी दिल्ली : कर्मचारी निवड आयोगाने एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), एआयए, एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. यासाठी उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर रजिस्ट्रेशन करू शकतात. 

रजिस्ट्रेशननंतर अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. तसेच, या पदांच्या भरतीसाठी परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल. परीक्षा सीबीटी पद्धतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. सीबीटी परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातील.

कोणत्या विभागात किती पदे?
बीएसएफ - 27875 पदे
सीआयएसएफ - 8598  पदे
सीआरपीएफ – 25427 पदे
एसएसबी – 5278 पदे
आयटीबीपी – 3006 पदे
एआर - 4776 पदे
एसएसएफ - 583 पदे
एनआयए - 225 पदे 

पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण या सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही जारी केलेली अधिसूचना तपासू शकता.

वयोमर्यादा :
अर्जदारांचे वय 1 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. याचबरोबर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.

अर्जाचे शुल्क :
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2023 परीक्षेसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) च्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया : 
सीबीटी परीक्षा आणि इतर परीक्षांद्वारे अर्जदारांची निवड केली जाईल. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पीईटीसाठी बोलावले जाईल. सीबीटी परीक्षेसाठी सर्व यशस्वी अर्जदारांना आयोगाकडून प्रवेशपत्र जारी केले जाईल. निवड प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी इत्यादींमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी नियुक्त केले जाईल. .

असा करता येईल अर्ज :
- एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
- होमपेजवर दिलेल्या लॉग इन टॅबवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा.
- आता संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा.
- कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क जमा करा.
- आता सबमिट करा.
 

Web Title: ssc gd constable 2023 notification out for 75768 posts 10th pass govt jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.