शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI कडून 5008 क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 09:52 IST

SBI Clerk Recruitment 2022 Notification: क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. क्लर्क कॅटगरीत ज्युनियर असोसिएटच्या  (ग्राहक सहायता आणि विक्री) भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात. आज म्हणजेच 07 सप्टेंबर 2022 रोजी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर अर्ज उपलब्ध असणार आहे. एसबीआय क्लर्क पदासाठी अर्ज मिळण्याची प्रक्रिया 20 दिवसांत म्हणजे 27 सप्टेंबर 2022 रोजी बंद होईल.

अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये 5008 पदे भरणार आहे. लखनौ आणि भोपाळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. एसबीआय क्लर्क 2022 साठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी बोलावले जाईल, जी नोव्हेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. 

वयोमर्यादावयोमर्यादेबद्दल बोलायचे तर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे ठेवण्यात आली आहे.

अर्ज शुल्कSC/ST/PwBD/ESM/DESM कॅटगरीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही. तरGeneral/ OBC/ EWS कॅटगरीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज कसा करावा? - या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers वर जाऊ शकतात.- येथे तुम्हाला 'RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Apply Online from 07.09.2022 TO 27.09.2022) (Advertisement No: CRPD/CR/2022-23/15)'under Current Openings’ वर क्लिक करा.- आता तुमच्यासमोर अॅप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म पूर्णपणे भरा.- एकदा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला डेटा सबमिट करावा लागेल.- अॅप्लिकेशन फॉर्मच्या अचूकतेची खात्री केल्यानंतर, स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या सूचनांचे पालन करून, तुम्हाला अर्जासह पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरावे लागेल.- शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाbankबँक