शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

SBI Recruitment 2021: SBI च्या 600 हून अधिक पदांच्या भरतीसाठी उद्या शेवटची संधी, असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 2:52 PM

SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

SBI SO Recruitment 2021: नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदांसाठी एकूण 606 भरती जारी केली आहे. (Sarkari Naukri SBI Recruitment 2021 Apply For 606 Posts Of SBI Last Date Is 18 October Know Registration Process)

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत, जे उमेदवार अर्ज करू इच्छितात, ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांना उद्यापर्यंत शेवटची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

दरम्यान, उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी एकूण 606 भरतीसाठी 15 नोव्हेंबर 2021 रोजी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड 3 नोव्हेंबर रोजी जारी केले जाईल. तसेच, पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना सल्ला दिला जातो की, त्यांनी भरतीसाठी जारी केलेले नोटिफिकेशन तपासावे, त्यानंतरच अर्ज करावा.

असा करा अर्ज...- SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा.- होम पेजवर उपलब्ध  Latest Announcements लिंकवर जा.- आता RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS ON REGULAR/CONTRACT BASIS वर जा.- आता अनिवार्य क्रिडेंशियल नोंदवून रजिस्ट्रेशन करा.- त्यानंतर अर्ज भरा, आता त्याची प्रिंट घ्या आणि ठेवा.

रिक्त पदांची माहितीएकूण पदे - 606रिलेशनशिप मॅनेजर - 314 पदेरिलेशनशिप मॅनेजर टीम लीड - 20 पदेकस्टमर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह - 217 पदेइन्वेस्टमेंट ऑफिसर - 12 पदेसेंट्रल रिसर्च टीम - 2 जागामार्केटिंग - 12 पदेडिप्टी मॅनेजर मार्केटिंग - 26 पदे

वयोमर्यादारिलेशनशिप मॅनेजर - 23 ते 35 वर्षेरिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) - 28 ते 40 वर्षेकस्टमर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह - 20 ते 35 वर्षेइन्वेस्टमेंट ऑफिसर - 28 ते 40 वर्षेसेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) - 30 ते 45 वर्षेसेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) - 25 ते 35 वर्षेमॅनेजर  (मार्केटिंग) - 40 वर्षेडिप्टी मॅनेजर (मार्केटिंग) - 35 वर्षेएक्झिक्यूटिव्ह - 30 वर्षे

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाSBIएसबीआयjobनोकरी