sarkari naukri ncl recruitment 2020 apprentice job vacancy 480 post online apply last date 15 november | NCL Recruitment 2020: दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय ४८० जागा भरणार    

NCL Recruitment 2020: दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय ४८० जागा भरणार    

ठळक मुद्देया भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची ४८० पदे नियुक्त केली जाणार आहेत.

NCL Apprentice Recruitment 2020 : नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने (एनसीएल) शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची ४८० पदे नियुक्त केली जाणार आहेत.

या पदांसाठी दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२० आहे.

NCL Recruitment 2020: शिकाऊ उमेदवारांच्या भरती अंतर्गत या पदासांठी होणार नियुक्ती

शैक्षणिक पात्रता
HEMM मेकॅनिक आणि माइन इलेक्ट्रिशियनच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य वेलडर आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदांवर नोकरी मिळू शकेल.

वयाची मर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय २४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ३१-०८-२०२० पर्यंत वय ग्राह्य धरले जाईल.

NCL शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी असे करा अर्ज
या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत http://nclcil.in/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://nclcil.in/ वर जाऊन पाहू शकता.

कोरोना संकट काळात नोकरीची संधी
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 
 

Web Title: sarkari naukri ncl recruitment 2020 apprentice job vacancy 480 post online apply last date 15 november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.