रेल्वेमध्येनोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड-III भरती २०२५ साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवार रेल्वे भरती मंडळाची अधिकृत वेबस्टाइटवरून ऑनलाइन अऱ्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ आहे. यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले नाहीत.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ६ हजार २३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. टेक्निशियन ग्रेड-१ सिग्नल पदासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे आणि टेक्निशियन ग्रेड ३ पदासाठी उमेदवारांचे वय १८-३० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क?एससी, एसटी, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईबीसी) श्रेणीतील उमेदवारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. जर ते संगणक-आधारित चाचणी (सीबीटी) ला बसले तर बँक शुल्क वजा करून त्यांना ४०० रुपये परत केले जातील.
परीक्षेचा पॅटर्नपरीक्षेचा कालावधी ९० मिनिटे आहे, ज्यामध्ये उमेदवारांना १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ३ गुण वजा केले जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.