Job Alert: बँकेत नोकरीची तयारी करा! 15000 हून अधिक जागा सुटल्या, दोनच बँका देतायत संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:56 PM2023-11-26T18:56:21+5:302023-11-26T18:57:42+5:30

Bank Recruitment 2023: मान्यताप्राप्त कॉलेजमधून पदवी घेणाऱ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

Prepare for a Bank Job! More than 15000 vacancies in SBI, IDBI, how to apply Recruitment 2023 | Job Alert: बँकेत नोकरीची तयारी करा! 15000 हून अधिक जागा सुटल्या, दोनच बँका देतायत संधी

Job Alert: बँकेत नोकरीची तयारी करा! 15000 हून अधिक जागा सुटल्या, दोनच बँका देतायत संधी

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची तेवढीच सावध करणारी बातमी आहे. स्टेट बँक आणि आयडीबीआय बँकेत १५००० हुन अधिक जागांवर कर्मचारी भरती केली जाणार आहे. ही गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी भरती आहे. मान्यताप्राप्त कॉलेजमधून पदवी घेणाऱ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. 

IDBI बँकेने एकूण 2100 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड 'O' पदासाठी एकूण 800 रिक्त जागा आहेत आणि एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) (कराराच्या आधारावर) पदासाठी एकूण 1300 रिक्त जागा आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून किमान 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 

महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: डिसेंबर 6, 2023. ३१ डिसेंबर, 30 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. 

SBI CBO भरती 
सर्कल बेस्ड ऑफिसर (SBI CBO) भरती 2023 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 5280 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 22 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 12 डिसेंबर 2023 पर्यंत अखेरचा अर्ज भरता येणार आहे. SBI CBO भरती परीक्षा जानेवारी 2024 मध्ये घेतली जाईल. 21 ते 30 वयोगटातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

SBI लिपिक भरती 2023
SBI लिपिक भर्ती 2023 द्वारे क्लार्क पदांसाठी एकूण 8283 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 3515 पदे, ओबीसीची 1919 पदे, ईडब्ल्यूएसची 817 पदे, अनुसूचित जातीची 1284 पदे आणि एसटी प्रवर्गातील 748 पदांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

Web Title: Prepare for a Bank Job! More than 15000 vacancies in SBI, IDBI, how to apply Recruitment 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.