आॅफिसमध्ये बिनधास खेळा व्हीडीओ गेम..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:44 IST2017-08-18T18:37:27+5:302017-08-18T18:44:51+5:30
तुमचा कामाचा ताण कुठल्या कुठे पळून जाईल, पण त्याआधी आपल्या बॉसला मात्र ते पटवून द्या..

आॅफिसमध्ये बिनधास खेळा व्हीडीओ गेम..
- मयूर पठाडे
सध्या आॅफिसमध्ये कामाचं इतकं टेन्शन आहे ना, की विचारायला सोय नाही. म्हणजे ‘कामाचं’ टेन्शन नाही, पण माणसं नाहीत, आहे त्या कर्मचाºयांवर रेटून न्यायचं, मालक नवीन कर्मचारी भरतही नाही आणि आपल्यावरचा कामाचा लोड कमीही होत नाही.. शिवाय डेडलाईन सतत डोक्यावर...
कामाचं टेन्शन बहुदा नसतंच. ते तर करावंच लागतं. पण चार माणसांची कामं एकट्यानं आणि तीही दिलेल्या डेडलाइनमध्ये पूर्ण करायची म्हटलं की टेन्शन येणारच. एकट्या माणसानं पळून पळून पळायचं तरी किती?
खरंच सांगतो, आॅफिसात आल्यावर एकदा का कामाला जुंपलं की साधं शरीरधर्मासाठी जागेवरुन उठायलाही वेळ होत नाही.. पार पिट्ट्या पडलाय..
सध्या सगळ्यांचंच असंच होतंय. कोणीही त्याला अपवाद नाही. थोडाफार फरक इतकंच.
अभ्यासक म्हणतात, दर थोड्या वेळानं, तासाला ब्रेक घ्या.. कसा घ्यायचा हा ब्रेक?.. पाच मिनिट गेले तर वाटायला लागतं, फार वेळ गेला. कसं आटपायचं आता हे काम?..
पण तुम्हाला माहीत आहे, ब्रेक घ्यायलाच हवा. तोही दर तासा, दिड तासाला. फक्त पाच मिनिटांचा घ्या, पण आपल्या कामात ब्रेक आवश्यक आहे. विशेषत: कामाचा डोंगर तुम्ही उपसत असाल, तर मग या ब्रेकची जास्तच आवश्यकता आहे.
ब्रेकमध्ये काय कराल? शास्त्रज्ञांनी कोणता प्रयोग केला?
१- संशोधकांनी नुकतंच एक महत्त्वाचं संशोधन केलं. त्यांचं म्हणणं आहे, ब्रेक तर घ्याच, पण या ब्रेकमध्ये तुम्ही मोबाइलवर चक्क व्हीडीओ गेम खेळा!
२- आता तुम्हाला कोण आॅफिसमध्ये व्हीडीओ गेम खेळू देणार? पण हा गेम खेळायचा आहे फक्त पाच मिनिट. तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी.
३- शास्त्रज्ञांनी त्यासाठी एक प्रयोगच केला. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि हेल्थकेअरच्या संदर्भातील एका संस्थेच्या कर्मचाºयांवर त्यांनी हा प्रयोग केला. त्याचे निष्कर्ष आश्चर्यजनक होते.
४- या कर्मचाºयांचे त्यांनी दोन गट केले. एका गटाला ब्रेकमध्ये व्हीडीओ गेम खेळायला दिला आणि दुसºया गटानं पाच मिनिट फक्त आराम केला.
५- या दोन्ही गटातील लोकांची स्ट्रेट लेवल, कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स, मूड याचाही त्यांनी विचार केला.
६- ज्या गटानं फक्त आराम केला होता, त्यांच्यातील स्ट्रेस लेवल फारसं कमी झाल्याचं त्यांना आढळून आलं नाही.
७- ज्या गटातल्या कर्मचाºयांनी ब्रेकमध्ये व्हीडीओ गेम खेळला, त्यांच्यातील तणाव मात्र खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं त्यांना आढळून आलं.
८- त्यामुळे बाकी असलेल्या कामातील त्यांची गती आणि त्यातली अचुकताही त्यामुळे वाढली.
९- हा प्रयोग ‘ह्यूमन फॅक्टर्स’ या नावाजलेल्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला असून आॅफिसवेळेत तुमचा ट्रेस घालवण्यासाठी तुम्ही व्हीडीओ गेम खेळला तर तुमचं टेन्शन, स्ट्रेस कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे.
१०- तुमचंही डोकं कामानं भणभणलं आणि तणतणलं असेल, तर आॅफिसच्या कामातून ब्रेक घेऊन पाच मिनिट व्हीडीओ गेम खेळा, आपल्या कामातून पूर्णपणे बाहेर या आणि नंतर नव्या जोमानं पुन्हा कामाला लागा.
११- पण तत्पूर्वी शास्त्रज्ञांचं हे म्हणणं आपल्या मालकाला, बॉसला अवश्य पटवून सांगा. नाहीतर..