ISRO मध्ये काम करण्याची तरुणांना संधी, पगार २ लाखांपर्यंत; दहावी पास असाल तरी करु शकता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:51 AM2020-03-20T10:51:44+5:302020-03-20T10:53:15+5:30

एसएसी वेबसाइटवर जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण ५५ रिक्त जागा आहेत

Opportunity for young people to work in ISRO; You can apply even if you pass tenth pnm | ISRO मध्ये काम करण्याची तरुणांना संधी, पगार २ लाखांपर्यंत; दहावी पास असाल तरी करु शकता अर्ज

ISRO मध्ये काम करण्याची तरुणांना संधी, पगार २ लाखांपर्यंत; दहावी पास असाल तरी करु शकता अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांना प्राप्त झाली आहे. अहमदाबाद येथील अंतराळ एप्लिकेशन सेंटरसाठी इस्त्रोने भरतीची जाहिरात दिली आहे. हे भारतीय अवकाश संशोधन व संघटनांचे प्रमुख केंद्र असेल. याठिकाणी एकूण ५५ रिक्त जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. ज्यासाठी अभियंता, पदव्युत्तर आणि तंत्रज्ञ अर्ज करु शकतात.

उपलब्ध रिक्त जागांसाठी वैज्ञानिक अभियंता, तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ ब वर्गासाठी ही भरती आहे. यात उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना २ लाख ८ हजार ७०० रुपये पगार त्यांच्या पात्रतेनुसार आणि पदानुसार दिलं जाणार आहे.

इस्रो भरतीत  कोण अर्ज करु शकेल?

एसएसी वेबसाइटवर जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण ५५ रिक्त जागा आहेत ज्यापैकी २१ वैज्ञानिक / इंजिनिअर, ६ तंत्रज्ञान सहाय्यक आणि २८ तंत्रज्ञ ब वर्गासाठी रिक्त जागा आहेत.

२१ वैज्ञानिक / इंजिनिअर रिक्त पदांसाठी खालील पात्रतांसह प्रथम श्रेणी पदवी असलेले उमेदवार अर्ज करु शकतात: इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्रात एमएससी, संगणक विज्ञान आणि एम.टेक या संगणकशास्त्र संबंधित विषयांमध्ये आणि संबंधित क्षेत्रातील एमई किंवा एमटेक , मेकॅनिकल अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील एमई किंवा एमटेक, स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमधील एमई किंवा एमटेक आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील एमई किंवा एमटेक. निवडलेल्या उमेदवारांना पद, अनुभव व पात्रता यावर ५६ हजार १०० ते २ लाख ८ हजार ७०० रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.

तंत्रज्ञ बीच्या २८ जागांसाठी, मॅट्रिक (एसएससी / एसएसएलसी / दहावी वर्ग) तसेच पुढील व्यवहारांमध्ये आयटीआय, एनटीसी किंवा एनएसी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. फिटर (६ रिक्त), मशिनिस्ट (३ रिक्त), इलेक्ट्रॉनिक्स (१० रिक्त) ), माहिती तंत्रज्ञान (२ ), प्लंबर (१), सुतार (1 रिक्त), इलेक्ट्रीशियन (१), मेकेनिकल (३), आणि केमिकल (१) अशा जागांसाठी भरती आहे .निवडलेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० वेतन देण्यात येईल.

भरतीसाठी अर्ज कसा कराल?

सर्व अर्ज ३ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ पर्यंत रोजी अधिकृत एसएसी वेबसाइटवर ऑनलाइन प्राप्त होतील. एसएसी येथे घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेतील उमेदवारांची गुणात्मकरित्या निवड केली जाईल. ज्यांना या पदासाठी अर्ज करावयाचे आहे अधिकृत संकेतस्थळ https://recruitment.sac.gov.in/OSAR/main.jsp यावर अर्ज करावा.

Web Title: Opportunity for young people to work in ISRO; You can apply even if you pass tenth pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो