कोकण रेल्वेमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 03:12 PM2023-11-16T15:12:33+5:302023-11-16T15:15:58+5:30

उमेदवार कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट konkanrailway.com द्वारे अर्ज करू शकतात. 

konkan railway recruitment notification 2023 job for graduates in railway apply at konkanrailway.com | कोकण रेल्वेमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या...

कोकण रेल्वेमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या...

रेल्वेमध्येनोकरी करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 190 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवार कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट konkanrailway.com द्वारे अर्ज करू शकतात. 

इच्छुक उमेदवार 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. याशिवाय महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे आणि कमाल वय हे 25 वर्ष असे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. त्यानंतर, शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेसाठी बोलावण्यात येईल. जे उमेदवार सर्व टप्पे पार करतील त्यांचा मेरिट लिस्टमध्ये समावेश केला जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

रिक्त जागांची माहिती
सिव्हिल इंजीनिअरिंग- 30 पदे
इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग- 20 पदे
इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग- 10 पदे
मेकॅनिकल इंजीनिअरिंग- 20 पदे
डिप्लोमा (सिव्हिल)- 30 पदे
डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स)-10 पदे
डिप्लोमा इलेक्ट्रिकल - 20 पदे
डिप्लोमा (मेकॅनिकल) – 20 पदे
सामान्य पदवीधर - 30 पदे

Web Title: konkan railway recruitment notification 2023 job for graduates in railway apply at konkanrailway.com

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.