काय करणार निर्णयच घेता येत नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:21 IST2017-08-08T16:15:19+5:302017-08-08T16:21:39+5:30
अनेक जणांना छोटे छोटे निर्णयही घेता येत नाहीत, लोक काय म्हणतील याचाच ते जास्त विचार करतात.

काय करणार निर्णयच घेता येत नाही?
-योगिता तोडकर
रोज आपण अनेक निर्णय घेत असतो, अगदी आत्ता चहा घेऊ कि खाऊ इथेपासून ते आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींना कलाटणी देणार्या निर्णयांर्पयत.
निर्णय घेताना अनेक घटक कार्यरत असतात. पण थोडक्यात त्याचे वर्गीकरण करायचे झाले तर आंतरिक आणि बाह्य घटक असे ढोबळमानाने आपण करू शकू.
आपल्या आंतरिक घटकांमध्ये भावना, विचार, अनुभव असे अनेक खेळाडू असतात. पण त्यात चौकार न षटकार मारणारे दोनच. मन काय सांगतंय (इंटय़ुशन) आणि विचार करायला लावणारी बुद्धी.
आता या दोनपैकी महत्वाचं कोण?
काही निर्णय आपल्याला खूप जलद घ्यावे लागतात, त्यावेळेस बहुतांशपणे मन काय कौल देतंय याचाच आधार घेतला जातो. पण काही वेळेस आपण घेतलेल्या निर्णयांचा खूप जास्त काळापर्यंत आपल्या आयुष्याच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, अशा एक ना अनेक स्तरांवर होणार असेल तर उत्तम मार्ग म्हणजे मन काय सांगतंय याला बुद्धीची जोड देणं.
असे निर्णय घेताना सर्व प्रथम मला काय हवं आहे याचा विचार करावा. एक समुपदेशक म्हणून जेंव्हा मी पाहते तेंव्हा मला असे दिसून आलं कि आपण लहानपणापासून मुलांना निर्णय घ्यायला शिकूच देत नाही. एकतर त्याच्या वतीने पालकच निर्णय घेत असतात. अथवा जेंव्हा मुलं निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो तेंव्हा सगळ्यात पहिले त्याला समाजाचे भय दाखवतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मला काय वाटतं, मला काय हवं यापेक्षा लोक काय म्हणतील याचा पगडा जास्त असतो. त्यामुळे समाज या पगड्याला काही वेळासाठी दूर ठेऊन स्वतर्च्या विचारांचा, आवडीचा नेमका शोध घ्यावा. कारण जेंव्हा माणूस स्वतर्च्या मनाला मारून निर्णय घेतो तेंव्हा तो निर्णय त्याच्या आयुष्यावर तितक्याच वाईट पद्धतीने परिणाम करतो जेवढा मनाप्रमाणे निर्णय घेतल्यानं होण्याची शक्यता असते. किमान जेंव्हा माणूस नेमका मार्ग शोधून निर्णय घेतो, तेंव्हा त्याची कामिगरी लक्षणीय असते. कारण त्याचा निर्णय त्याची जबाबदारी असते.
पण स्वतर्ला जे हवं आहे त्याप्रमाणे जर निर्णय घेतला तर त्यामुळे होणारं नुकसान व लाभ लक्षात घ्यावा. जो निर्णय आपण घेऊ इच्छितो त्याला समाजाची जोड कशी मिळू शकते याचा पूरक विचार करावा. आपल्या निर्णयासाठी थोडीशी लवचिकता व त्यासाठीची योग्य वेळ हे एकत्न आणलं तर समाजाची साथ नक्कीच मिळू शकते. निश्चितच निर्णय घेतल्यानंतर आयुष्यच्या ज्या स्तरावर बदल व नुकसान होणार आहे त्यासाठी विचार करून नेमके मार्ग काढता येऊ शकतात. फक्त कोणताही निर्णय घेताना साहस हवं. ते सर्व गुणांची जबाबदारी घेतं.
निर्णय घेताना परिस्थिती आपल्या हातात असो वा नसो, जर आपण आपले मन व विचार यांची अशा पद्धतीने योग्य सांगड घातली तर निश्चितच योग्य ते व योग्य पद्धतीने निर्णय आपण घेऊ शकतो.
( लेखिका समुपदेशक आहे.)