शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध विभागात भरती; मिळणार 3.5 लाख पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 16:25 IST

IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने विविध व्यवस्थापकीय पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या पोस्ट विभागांतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने विविध व्यवस्थापकीय पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने 8 सप्टेंबर 2022 रोजी या भरतीसाठी एक जाहिरात जारी केली होती. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध विभागांमध्ये भरती होत आहे. 

टेक्नोलॉजी, प्रोडक्ट, ऑपरेशन्स, रिस्क मॅनेजमेंट आणि फायनान्स विभागामध्ये असिस्टेंट जनरल मॅनेजर (एजीएम), चीफ जनरल मॅनेजर (सीजीएम), सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर ही पदं भरली जातील. तसेच टेक्नोलॉजी, कॉम्प्लायन्स आणि ऑपरेशन्स डिपार्टंमेट्समध्ये डिप्टी जनरल मॅनेजर (डीजीएम), चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर आणि इंटर्नल ऑम्बुड्समॅन या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल.

या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार IPPB ची अधिकृत वेबसाईट ippbonline.com वर भरती विभागात दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड करू शकतात. तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता.

अर्ज करण्यासाठी, सर्व प्रथम, उमेदवारांना त्यांचे नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे नोंदणी करावी लागेल. यानंतर, आपण प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून आपला अर्ज सबमिट करू शकता.

शेवटची तारीख

या पदांसाठी 10 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 24 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतील.

अर्जाची फी

उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील. SC, ST आणि दिव्यांग यांसारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

किती मिळेल पगार?

1. स्केल 7 पदं - रु. 3.5 लाख प्रति महिना2. स्केल 6 पदं - रु. 3.13 लाख प्रति महिना3. स्केल 5 पदं - रु.2.53 लाख प्रति महिना 4. स्केल 4 पदं - रु. 2.13 लाख प्रति महिना 5. स्केल 3 पदं - रु. 1.79 लाख प्रति महिना6. स्केल 2 पदं - रु. 1.41 लाख रुपये प्रति महिना 7.स्केल 1 पदं - रु. 1.12 लाख प्रति महिना 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरी