शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:33 IST

Eastern Railway Apprentice Jobs 2022: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्र उमेदवार 20 मे 2022 पर्यंत पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून आयटीआय (ITI) प्रमाणपत्र घेतलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. पूर्व रेल्वे 2972 ​​अप्रेंटिस पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी, गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेने अधिसूचना जारी करून अर्जाची प्रक्रिया सुरू केली होती.

आता या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्र उमेदवार 20 मे 2022 पर्यंत पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अप्रेंटिसशिप दरम्यान निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला एक निश्चित स्टायपेंड दिला जाईल.

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादाअप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण असावेत. याशिवाय, त्यांच्याकडे एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटीद्वारे (SCVT) प्रमाणित संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. दरम्यान, तुम्हाला या भरतीच्या अधिसूचनेमध्ये याबद्दल अधिक माहिती मिळेल.

निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्कअर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वे 10वी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करेल. जे अंतिम यादीत स्थान मिळवू शकतील त्यांची अप्रेंटिस उमेदवारीसाठी निवड केली जाईल. याचबरोबर, अर्जाच्या शुल्काबद्दल बोलायचे झाले तर सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटगरीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. अनुसूचित जाती, जमाती दिव्यांग आणि महिलांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

असा करा अर्जया पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांना पूर्व रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यामुळे त्यांना या भरतीची अधिसूचना आणि अर्जाची लिंक मिळेल. अधिसूचनेमध्ये दिलेल्या स्टेप्स पाहून उमेदवार अर्ज फॉर्म प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनbusinessव्यवसाय