शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

12 हजाराहून अधिक GDS पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख आली जवळ, लवकरच करा अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 13:57 IST

उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल.

नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागाने जीडीएस (GDS) पदांवर बंपर भरती केली आहे. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल. आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते तत्काळ अर्ज करू शकतात. 

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या जीडीएस भरती मे 2023 च्या अधिसूचनेनुसार एकूण 12 हजार पदांसाठी नियुक्त्या केल्या जातील. याचबरोबर, 11 जून रोजी अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्त्या करण्याची संधी देखील दिली जाईल. 

12 जून 2023 पासून उमेदवारांसाठी दुरुस्ती विंडो खुली असणार आहे. या दरम्यान, जर कोणत्याही उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये काही अडचण असल्याचे वाटत असेल तर ते 14 जून 2023 पर्यंत दुरुस्त्या करू शकतात. मात्र, काही विभागांमध्येच सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. उमेदवार पोर्टलवरून मदर माहिती मिळवू शकतात.

सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शिथिलता दिली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी.

पोस्टल विभागात जीडीएस भरतीसाठी अर्ज कसा करावा?सर्वात आधी उमेदवारांना 'नोंदणी टॅब' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे डिटेल्स जसे की मोबाइल नंबर, ईमेल, नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी प्रविष्ट करा. आता ऑनलाइन अर्ज सबमिट करा - नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि सर्कलची निवड करावी लागेल. त्यानंतर आता प्राधान्ये निवडा. उमेदवार केवळ एक किंवा अधिक निवडलेल्या विभागांमध्ये जीडीएसच्या एक किंवा अधिक रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरी