शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायुसेनेकडून अग्निवीरच्या नव्या भरतीची घोषणा, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:43 IST

IAF Agniveer Recruitment 2022-2023 : भारतीय वायुसेनेने 12 ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट केले.

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने नवीन अग्निवीर वायू भरतीसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच, भरतीसाठी परीक्षा जानेवारी 2023 मध्ये घेतली जाईल, अशी माहिती भारतीय वायुसेनेने ट्विट करून दिली आहे.

भारतीय वायुसेनेने 12 ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट केले. ज्यामध्ये लवकरच भरतीसंबंधी संपूर्ण अधिसूचना अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर प्रसिद्ध केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर वायू 2022 मध्ये भरती करण्यात आली आहे. आता 2023 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्याची नोंदणी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे.

दरम्यान, गेल्या भरतीप्रमाणे, ज्या उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजीसह 12वी किंवा तीन वर्षांच्या अभियांत्रिकी डिप्लोमामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवले आहेत, त्यांना आगामी भरतीमध्ये सामील होण्याची संधी दिली जाऊ शकते. तर, विज्ञानाव्यतिरिक्त इतर विषयांसाठी 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजीत किमान 50 टक्के गुण मिळवलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतील. याचबरोबर, मागील भरतीच्या आधारे, असेही म्हणता येईल की उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, वैद्यकीय चाचणी, शारीरिक चाचणी या आधारे केली जाईल.

महिला अग्निवीरांचाही भारतीय वायुसेनेत समावेश करणारभारतीय वायुसेनेच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त चंदीगडमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Vivek Ram Chaudhary) यांनी भारतीय वायुसेनेतील (Air Force) महिला अग्निवीरांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली होती. यावेळी पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचाही समावेश करण्याचा आमचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले होते. विवेक चौधरी म्हणाले होते की, 'भारतीय वायुसेनेने वायुसेना अग्निवीर योजनेंतर्गत (Air Force Agniveer) महिला उमेदवारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीपासून महिला अग्निवीरांना सहभागी करून घेण्याचाही आमचा विचार आहे.'

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAgneepath Schemeअग्निपथ योजनाjobनोकरी