how to impress people without uttering a word? | एक शब्दही न बोलता लोकांना कसं इम्प्रेस कराल?

एक शब्दही न बोलता लोकांना कसं इम्प्रेस कराल?

ठळक मुद्देजमाना प्रेझेण्टेशनचा आहे. तिथं आपण कमी पडू नये.

फस्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. पण अनेकजण जातात मारे इम्प्रेशन मारायला पण तोंड उघडलं की पचका होतो.काहीही बोलतात. नको ते बोलतात. उगीच हसतात. फालतू जोक मारतात. त्यापेक्षा कुठं गप्प रहायचं हे कळलं तरी आपलं इम्प्रेशन झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणत बरं राहील. पण असं न बोलता इम्प्रेशन कसं मारता येईल किंवा आपली इमेज चांगली कशी राहील याचा काही विचार करायला हवा. त्यासाठी ही काही सूत्रं.
1) कपडे कसे घालताय. म्हणजे भारी, फॅशनेबल, महागडे, ब्रॅण्डेड असे नव्हेत. तर कपडे आपल्या मापाचे, प्रसंगाला अनुरुप घाला. त्यासाठी फार डोकं नाही तर कॉमन सेन्स लागतो. तो वापरा.
2) चेहर्‍यावर हसू आणि आत्मविश्वास हवा. हसू म्हणजे फिदीफिदी हसू नव्हे. प्रसन्न चेहरा. एक हसरी रेषा हवी. ती ही प्रसंगानुरुप. दुर्‍खात हसू नका. भीती वाटली तरी आत्मविश्वासानं वावरा.
3) तुमचे जे कोणी आदर्श, आवडते, आयकॉन असतील त्यांची स्टाईल सुरुवातीला फॉलो केली तरी चालते. म्हणजे त्यांचं बोलणं, वागणं, हातवारे. निदान चुका कमी होतात.
4) मोजकं बोला. कुणी विचारलं नसताना ढमकन काही बोलू नका.
5) फोनवर मोठमोठय़ानं बोलू नका. फोनमध्येच नाक खुपसून बोलू नका. त्यापेक्षा जरा वातावरणाचा अंदाज घ्या. 
6) कुणी दोन लोक बोलत असतील तर त्यांच्यात जाऊन उभं राहू नका. मध्येच ढमकन बोलू नका.
7) लोकांचं ऐकून घ्या. ते काय सांगतात याकडे लक्ष द्या.
8) लोक आपल्याला नोटीस करतील असं वागा. म्हणजे न बोलताही आपण तिथं आहोत असं वागत आपलं अस्तित्व जाणवून द्या.

Web Title: how to impress people without uttering a word?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.