How do you prepare for a job in Corona pandamic Definitely try these 5 tips | कोरोनाकाळात जॉब मिळवण्यासाठी कशी तयारी कराल? ५ टिप्स वापरून नक्की होईल फायदा

कोरोनाकाळात जॉब मिळवण्यासाठी कशी तयारी कराल? ५ टिप्स वापरून नक्की होईल फायदा

कोरोनाकाळात आर्थित मंदीचा फटका बसत असताना अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  कोरोनाचा प्रसार वेगानं वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं त्यामुळे अनेकांचे कामधंदे ठप्प होते. अशा स्थितीत अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर अनेकांना प्रमोशनला मुकावं लागलं आहे, खरंतर कोरोनाची माहामारी कधी आटोक्यात येणार आणि जनजीवन कधी सुरळीत होणार याबाबत कोणालाही स्पष्ट सांगता येत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला कोरोनाकाळात नोकरी मिळवायची असेल तर कशी तयारी करायला हवी याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. 

 घाबरू नका

जर तुम्ही घर चालवण्यासाठी किंवा पैसे मिळावेत म्हणून जॉब करत असाल तर अचानक जॉब गमवावा लागल्यास अस्वस्थ व्हायला होते. काहीवेळा आपलं कसं होईल, नोकरी कधी मिळणार, पैसे कसे मिळणार असे विचार मनात येऊन भीती वाटायला  लागते. अशी स्थिती उद्भवल्यास स्वतःला दोष देऊ नका. काही काळासाठी जॉब गमावणं  हा तुमच्या करीअरचा शेवट नसल्यामुळे हिंमत न हारता परिस्थितीचा सामना करा. 

 मानसिकदृष्या तयार राहा 

तुम्ही ज्या  कंपनीत काम करत आहात . त्या कंपनीत सध्या काय सुरू आहे. तुमची पगार कमी झाला आहे का?,  तुमचे टार्गेट्स पूर्ण होताहेत का? कारण अचानक नोकरीवरून काढून टाकण्याचे कानी पडल्यास मानसिकरित्या त्रास होऊ शकतो. म्हणून अशी स्थिती उद्भवण्यासाठी स्वतः हिंमत न हारता वास्तव स्विकारा आणि परिस्थितीचा सामना करा.  

 नेहमी स्वतःला अपडेट ठेवा

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर प्रोफाइल तुम्ही नेहमी अपडेट करतंच असाल, पण नोकरी मिळवून देत असलेल्या साईट्सवर तुम्ही आपलं प्रोफाईल अपडेट करायला हवं. त्यामुळे तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होण्याची शक्यता असते. कारण कोरोनाच्या महामारीमुळे जॉब मिळणं कठीण होऊ शकतं. म्हणून तुमचा सिव्ही लिक्डंइन प्रोफाईवर अपडेट करा. जॉब व्यतिरिक्त इतर कंपनीची माहिती घ्या,  आपल्या बॉस सोबत नवीन आयडिया शेअर करा, स्वतःचा सिव्ही लेटेस्ट फोरमॅटनुसार तयार करा.

 मार्केट ट्रेंड्सचा अभ्यास करा

एक माणूस एकावेळी एकच काम करतो असं पूर्वी असायचं. पण आता एकाच पोस्टवर असताना अनेक काम पाहावी लागतात. त्यामुळे तुम्हाला सगळी कामं यायलाच हवीत. नसल्यास ती कामं शिकून घेण्याची तयारी असावी. माझ्या कडून कसं होईल? मला करता येईल का? असा विचार करू नका. नेहमी पॉजिटिव्ह विचार ठेवा. डिजीटल फ्रेंण्डली व्हा म्हणजेच सोशल मीडियाचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊन वापर करा. यासोबतच मार्केट टेंड्सचा अभ्यास करा. 

स्वतःमध्ये बदल करा

वेळेनुसार स्वतःला बदला. तसंच तुम्ही जे काही करणार आहात त्याची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर प्रोफाइल तुम्ही नेहमी अपडेट करतंच असाल, पण नोकरी मिळवून देत असलेल्या साईट्सवर तुम्ही आपलं प्रोफाईल अपडेट करायला हवं. सकारात्मक विचार करा. निराशेचा सामना करावा लागल्यास आपल्या कुटुंबाला वेळ द्या. मानसोपचार तज्ज्ञांची भेट घ्या. 

हे पण वाचा-

coronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शहरांसह ग्रामीण भागातही वेगानं पसरतोय कोविड 19; सिरो सर्व्हेचा दुसरा टप्पा असू शकतो भीषण

Web Title: How do you prepare for a job in Corona pandamic Definitely try these 5 tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.