government of tripura group d mts posts recruitment 2021 notification released check details | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MTS पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या...        

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MTS पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या...        

ठळक मुद्देयासंदर्भात संपूर्ण माहिती डॉयरेक्‍ट्रेट ऑफ एम्‍प्‍लॉयमेंट सर्व्हिसेस अँड मॅनपॉवर प्लॅनिंग (DESMP) त्रिपुराच्या अधिकृत वेबसाइट employment.tripura.gov.in वर जाहीर करण्यात आली आहे.

Sarkari Naukri 2020 : ज्वाइंट रिक्रूटमेंट बोर्ड त्रिपुराने अधिकृत जाहिरात जारी केली असून मल्टी टास्किंगच्या (MTS) रिक्त 2,500 पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात संपूर्ण माहिती डॉयरेक्‍ट्रेट ऑफ एम्‍प्‍लॉयमेंट सर्व्हिसेस अँड मॅनपॉवर प्लॅनिंग (DESMP) त्रिपुराच्या अधिकृत वेबसाइट employment.tripura.gov.in वर जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार निर्धारित पात्रता, अर्ज फी आणि निवडीशी संबंधित इतर माहितीसाठी अधिसूचना डाऊनलोड करू शकतात.

नॉन-टेक्निकल, ग्रुप डी कॅटगरीतील मल्टी टास्किंग पदासांठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 2,500 पदे भरती करायची आहेत, त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1,400 रुपयांच्या ग्रेड-पे नोकरीवर नियुक्त केले जाईल. त्रिपुरा स्टेट पे मॅट्रिक्स 2018 च्या आधारे उमेदवारांना पगार मिळेल. ऑनलाईन अर्ज 28 डिसेंबरपासून सुरू होतील आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2021 आहे.

या पदांवरील भरतीसाठी अनारक्षित कॅटगरीतील आठवी पास उमेदवार अर्ज करु शकतात. अनुसूचित जाती / जमाती / पीएच कॅटगरीतील पाचवी पास उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 41 वर्षे असावे. मात्र, राखीव कॅटगरीतली उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयात 5 वर्षे सवलत देण्याची तरतूद आहे.

अर्ज करण्यासाठी अनारक्षित कॅटगरीच्या उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल, तर राखीव उमेदवारांसाठी 150 रुपये भरावे लागणार आहेत. पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. उमेदवारांची नियुक्ती एक 85 नंबरची लेखी परीक्षा आणि 15 क्रमांकाच्या मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल.
 

Web Title: government of tripura group d mts posts recruitment 2021 notification released check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.