शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

Google कंपनीत नोकरी कशी मिळवावी? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 18:19 IST

Google News Today: Google मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, अशा दोन्ही पदांवर नोकऱ्या आहेत.

Google News Today: भारतात दरवर्षी हजारो तरुण इंजिनीअरिंगची पदवी घेतात. मोठ्या कंपनीत नोकरी मिळावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. Google मध्ये नोकरी मिळावी, असे प्रत्येकालाच वाटते. पण, Google मध्ये नोकरी मिळवणे, सोपी गोष्ट नाही. यासाठी मोठ्या प्रोसेसमधून जावे लागेत. शिवाय, तुम्ही मोठ्या नावाजलेल्या कॉलेजमधून पदवी मिळवलेली असायला हवी. Google मध्ये नोकरी कशी मिळवावी, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये Google सर्वात मोठी कंपनी आहे. गुगलमध्ये लाखो कर्मचारी काम करतात. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेते. कर्मचाऱ्यांना चांगले पॅकेज, चांगली पगारवाढ, यासोबतच इतर अनेक सुविधा दिल्या जातात. अनेकांना वाटते की, गुगलकडे फक्त तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नोकर्‍या आहेत. पण हे साफ चुकीचे आहे. गुगलमध्ये SEO आणि कंटेंट रायटिंगमध्ये करिअर करण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत. 

गुगल मधील नोकऱ्यांची यादीGoogle टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकऱ्या देते. गुगल नोकऱ्यांमध्ये लाखो/कोटींचे पॅकेज ऑफर केले जाते. तुम्ही Google च्या अधिकृत वेबसाइट google.com किंवा https://www.google.com/about/careers/applications/ वर Google करिअरमध्ये जाऊन नोकऱ्या तपासू शकता.

  • जूनिअर सॉफ्टवेयर इंजीनिअर
  • अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टेंट
  • डेटा सायंटिस्ट
  • जूनिअर बिझनेस अॅनालिस्ट
  • यूएक्स डिझायनर
  • एसईओ स्पेशलिस्ट (SEO Jobs)
  • सॉफ्टवेअर टेस्टर
  • कॉपीरायटर
  • नेटवर्क इंजीनिअर
  • अकाउंट मॅनेजर इ.

या 5 टिप्सद्वारे तुम्ही Google मध्ये नोकरी मिळवू शकतातुम्हाला गुगलमध्ये नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्या बायोडाटा आणि कव्हर लेटरवर काम करा. तुम्ही तुमचा रेझ्युमे एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून तयार करुन घेऊ शकता.

रेझ्युमे कसा असावा?- तुमचा रेझ्युमे फक्त 1 पानाचा बनवा. त्याचा फॉन्ट असा असावा की, तो वाचण्यास सोपा असेल. शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, संपर्क क्रमांक इत्यादी लिहा.

कव्हर लेटर कसे असावे?- Google चांगले शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाच कामावर ठेवते. तुमचे कव्हर लेटर अतिशय आकर्षिक असले पाहिजे, जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवेल. कव्हर लेटर 3-4 पॅराग्राफचे असावे.

मुलाखतीची तयारी कशी करावी?- नोकरीची माहिती जाणून घ्या आणि त्यानुसार तुमची कौशल्ये विकसित करा. तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहिलेला प्रत्येक तपशील काळजीपूर्वक वाचा. मुलाखतीत त्यावरुनच प्रश्न विचारले जाऊ शकतात.

कौशल्ये कशी विकसित करावीत?- Google मध्ये नोकरी मिळविण्यासाठी केवळ पदवी मदत करणार नाही. पदवीसोबत इतर डिप्लोमा आणि सर्टिफिकेट आणि तुमच्या कौशल्यांवरही काम करावे लागेल. तुमच्याकडे नेतृत्व, विश्लेषणात्मक विचार, टीमवर्क यासारखी कौशल्ये असली पाहिजेत.

टॅग्स :googleगुगलCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरीtechnologyतंत्रज्ञानEducationशिक्षण